पंधरवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला, केळी बागायतदारही चिंतेत, भाजीपाला महागला

| Updated on: May 19, 2023 | 10:47 AM

केळी बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून त्यामुळे केळी बागायतदारही चिंतेत सापडले आहेत. त्याचबरोबर इतर पिकांची सुद्धा तशीचं अवस्था आहे. केळीच्या भावात चढ-उतार होत असल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.

पंधरवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला, केळी बागायतदारही चिंतेत, भाजीपाला महागला
banana crop
Image Credit source: tv9marathi
Follow us on

महाराष्ट्र : आठवड्यापूर्वी एकाच दिवसात 700 रुपये प्रतिक्विंटलने केळीच्या (Banana) भावात वाढ झाली होती. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. मात्र,चार दिवसांपूर्वी एकाच दिवसात 400 रुपयांची घसरण झाली आहे. केळीच्या भावात चढ-उतार होत असल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली असून शेतकरी (farmer) चिंतेत सापडला आहे. दिवसभरात अजून-मधून ढगाळ वातावरण उष्णतेचे प्रमाण झाल्यामुळे केळीच्या मालाची परिपक्वता उशिराने झाली आहे. परिणामी केळीची (banana cultivation) आवक थांबली असल्यामुळे बाजारभावातही उसळी होती. ही वार्ता शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरली. मात्र, मे महिन्यात ४४ ते ४७ अंश सेल्सिअस तापमानाने तब्बल आठ ते दहा दिवस सातत्य राखल्याने केळी मालाचे मोठ नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

कोथिंबीर ७० रुपये किलो

गेल्या पंधरवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामुळे हिरव्या पालेभाज्यांच्या उत्पन्नात घट निर्माण झाली आहे. उत्पन्न कमी व मागणी अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे. ३० ते ४० रुपये किलोवर असलेली मेथी, पालक व पोकळा आता ६० ते ६५ रुपये किलोवर पोचली आहे. गेल्या पंधरवड्यात १०० ते ११० रुपये किलोवर असलेली गवार शेंग सध्या ६० रुपये किलोने विक्री होत आहे. तर या भाववाढमुळे महिलांच्या किचनचेही बजेट कोलमडले आहे.

शेळी पालन करणाऱ्यांना सुखाचे दिवस

नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने चाऱ्याची टंचाई जाणवतेय, अश्या स्थितीत मागणी कायम असल्याने बकऱ्यांच्या भावात मोठी उसळी आलीय. त्यामुळे शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे देऊन बकऱ्यांची खरेदी सध्या सुरू आहे. ऐन लग्नसराईत शेळी पालन करणाऱ्या ग्रामीण शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. बकऱ्याला अधिकची किंमत मिळत असल्याने शेळी पालन करणारे सुखावले आहेत.

हे सुद्धा वाचा

खरीपपूर्व हंगामाला सुरुवात

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने शेतात तणांची वाढ अधिक प्रमाणात झाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी तयारीला लागला आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत पोहोचला असूनसुद्धा जीवाचा आटापिटा करत बळीराजा प्रखर तप्त उन्हात मशागत करत आहे. हवामान खात्याने उष्णतेची लाट सांगितली असली, तरी खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी उन्हाचे चटके खात मशागत करत आहे. शेतकऱ्यांची दिनचर्या पहाटे चार वाजतापासून सुरू होते. सकाळी उठल्यावर सर्जाराजाला चारा मांडणे, सहा वाजता शेतात वखरणीस सुरुवात करतो, नऊ वाजल्यापासून शेतकऱ्याला उन्हाचे चटके खात तो बारा वाजेपर्यंत मशागत करतो. नंतर परत दुपारी तीन वाजतापासून ते सहा वाजेपर्यंत वखराच्या पाळीने प्रखर उन्हात उष्णतेची लाट अंगावर घेत मशागत करतो. शेतात धसकटे वेचणे, काडी कचरा साफ करून पेटविणे, वखरणे इत्यादी कामे सध्या या उष्णतेत सुरू आहे. पाऊस पडण्यापूर्वी रानातील तण साफ केले नाही, नंतर मशागत हवी तशी होत नसल्यामुळे 42 अंश तापमान अंगावर घेऊन मे महिन्यातच संपूर्ण कामे पूर्ण करतात. जेणेकरून पाऊस पडल्यानंतरचा हंगाम लवकर करता यावा व पेरणी वेळेवर करता यावी, असे नियोजन बळीराजा करत आहेत.