E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’ची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, ना शेतकऱ्यांचे नुकसान, ना कृषी विभागावर भार

| Updated on: Jul 01, 2022 | 3:29 PM

'ई-पीक पाहणी' नेमकी करायची कशी याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्मार्ट फोनचा वापर करुन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आल्याने कृषी विद्यापीठांनी हा मार्ग काढला आहे.

E-Pik Pahani : ई-पीक पाहणीची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, ना शेतकऱ्यांचे नुकसान, ना कृषी विभागावर भार
पीक पाहणी उपक्रम
Follow us on

सोलापूर : (E- Pik Pahani) ‘ई-पीक पाहणी’सारख्या उपक्रमाला सुरवात होऊन दोन वर्ष उलटले तरी अद्याप मूर्त स्वरुप मिळालेले नाही. या माध्यमातून (Crop Detail) पिकांची नोंद तर होतेच पण नुकसानभरपाई दरम्यान या पाहणीच्या आधारे शेतकऱ्यांना मदतही मिळत आहे. शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या अनुशंगाने या नोंदीची जबाबदारी (Farmer) शेतकऱ्यांवरच सोपवण्यात आली असली तरी स्थानिक पातळीवरील अडचणी आणि तांत्रिक बाबी यामुळे आता कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीच ‘ई-पीक पाहणी’ उपक्रम राबविण्यात मदत करणार आहेत. शिवाय महसूल आणि कृषी विभागाच्या अंतर्गत मतभेदामुळे याकडे दुर्लक्ष होत होते. पण आता राज्यातील चारही कृषी महाविद्यालयाचतील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण अन् शेतकऱ्यांना सल्ला

‘ई-पीक पाहणी’ नेमकी करायची कशी याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्मार्ट फोनचा वापर करुन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आल्याने कृषी विद्यापीठांनी हा मार्ग काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंद तर होणार आहेच पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध विषयाचा अभ्यास करणेही विद्यार्थ्यांना शक्य असल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची याकरिता नोंदणी सुरु करण्यात आल्याचे ई-पीक पाहणीचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी सांगितले आहे.

मोबाईल अॅपद्वारे नोंदणी

शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पेऱ्याची नोंदणी थेट शासन दरबारी होण्याच्या अनुशंगाने ही मोहिम राज्यात राबवली जात आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकराने हे पाऊल उचलले असून शेतकऱ्यांना याचा फायदा होतो शिवाय तलाठी, ग्रामसेवक यांच्यावरील कामाचा ताणही कमी झाला आहे. मोबाईलच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करावी लागते. शिवाय विद्यार्थ्यांसाठी ही पध्दत सोईस्कर राहणार आहे. कृषी महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

‘ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.

2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.

3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.

4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.

5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.