लातूर : उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक प्रयोग केले जात आहेत. (Agricultural Production) शेती उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाचे आहे ते पाणी. गेल्या दोन वर्षामध्ये पाण्याची भीषण टंचाई भासत नसली तरी यापूर्वी केवळ पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याची मोठ्या प्रमाणात झळ ही बसलेली आहे. काळाच्या ओघात पाठाने ऐवजी (Drip) ठिबकद्वारे पाणी देण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे पाणी बचत तर झालीच पण योग्य प्रमाणात पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पदनात वाढ झाली. आता ठिबकमध्येही सुधारणा होऊन डबल ड्रीपद्वारेही पिकांना पाणी देणे शक्य झाले आहे. अद्याप ही प्रणाली जास्त प्रमाणात वापरली जात नसली तरी उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाची मानली जाते.पिकांच्या दोन्ही बाजूस समप्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने मुळांची खोली आणि विस्तार तर वाढतोच पण (fertility of the soil) जमिनीची सुपिकता टिकून राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे फळबाग, ऊस आणि इतर पिकांसाठी ‘डबल ड्रीप’ चा वापर होणे ही काळाची गरज आहे.
ठिबक सिंचनामुळे उत्पादनात वाढ झाली हे तर स्पष्ट झालेच आहे. पण यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर होऊ लागला आहे. यामुळे पाणी प्रमाणात आणि त्याबरोबर दिले जाणाऱ्या अन्नद्रव्यांचाही योग्य वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर हा फायदेशीर ठरत आहे. पीक पद्धती, जमिनीचा प्रकार, चढ – उतार, जमिनीत पाणी मुरण्याचा वेग आणि पाणी शोषून घेण्याची क्षमता, जमिनीची जलधारण क्षमता, जमिनीत होणारे पाण्याचे उभे-आडवे प्रसरण, पिकांची उन्हाळ्यामधील जोमदार वाढीच्या अवस्थेतील पाण्याची गरज लक्षात घेऊन योग्य प्रकारच्या ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.
पेरणी करुन जे उत्पादन घेतले जाते त्यासाठी ‘डबल ड्रीप’ ही अत्याधुनिक प्रणाली पाहिजे त्या प्रमाणात उपयोगी येत नाही. पण फळझाडे, ऊस यासाठी डबल ड्रीपचा उपयोग होऊ शकतो. द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू, पपई, केळी, सीताफळ, संत्रा, मोसंबी गादी वाफ्यावरील कांदा, आले आणि उसासाठी या पद्धतीचे ठिबक सिंचन उपयुक्त ठरते. शेतीकाम तर सुखकर होतेच पण वेळीची बचतही होते.
डबल ड्रीपमुळे झाडाच्या दोन्ही बाजूंस मुळाच्या अपेक्षित खोलीत ओलावा राखला जातो. त्यामुळे दोन्ही बाजूस अन्नद्रव्ये आणि पाणी शोषण करणाऱ्या मुळांची योग्य प्रमाणात वाढ होते.वनस्पतीच्या मुळा ह्या खोलवर जातात त्यामुळे अन्नद्रव्ये आणि पाणी कार्यक्षमता वाढली जाते. दोन्ही बाजूने ड्रीपने पाणी दिल्याने जमिनीचे तापमान योग्य राखले शिवाय सर्व बाजूंनी झाडाची एकसारखी वाढ होते.पाणी आणि अन्नद्रव्यांचा निचरा रोखला जाऊन मातीची धूप थांबते. एवढेच नाही तर किडीचा प्रादुर्भावही कमी होते आणि उत्पादन वाढ होते.
टीप : सदरील माहिती ही कृषी अभ्यासक अरुण देशमुख यांच्या लेखातून घेतली असून कृषी सहायकाच्या सल्ल्यानुसार नियोजन करणे गरजेचे आहे.
Grape : द्राक्ष खरेदीतून शेतकऱ्यांची फसवणूक, व्यवहार करताना नेमकी काय काळजी घ्यावी?
Agricultural Scheme : शेतकऱ्यांचे योजनांसाठी अर्ज, मात्र निवड होते कशी? वाचा सविस्तर
शेतीच्या जोडव्यवसयांना सरकारचे पाठबळ, पायाभूत सुविधा अन् योजनांचाही मिळणार लाभ