बुलडाणा : आतापर्यंत शेतीमालाच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या पण यंदा (Seeds) बी-बियाणांचे दरही असे काय वाढले आहेत की (Theft of seeds) बियाणांची चोरी करुन ते जमिनीत गाढण्याची नामुष्की ओढावली आहे. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही पण बुलडाणा जिल्ह्यातील मातोळा येथे चक्क कृषी सेवा केंद्र फोडून लाखोंचा माल लंपास करण्यात आला होता. त्यामुळे वाढीव बियाणे दराचा काय परिणाम होऊ शकतो याचा प्रत्यय आला आहे. (Kharif Season) बी-बियाणांसोबत दुकानातील लाखों रुपयांचे दागिणेही चोरट्यांनी लंपास केले होते. अखेर आठ दिवसानंतर दुकान फोडणाऱ्या आरोपींना बोराखडी येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यंदा खताच्या दरात वाढ होणार हे निश्चित होते. कच्च्या मालाचा तुटवडा आणि जागतिक पातळीवरील युध्दजन्य परस्थिती यामुळे खताचे दर वाढले आहेत. यामध्ये सरकारने अनुदान जरी वाढवले असले तरी शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतच आहे. हे कमी म्हणून की काय महाबीजने सोयाबीन बियाणांच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे आता बियाणे चोरीच्या घटनाही होऊ लागल्या आहेत. पेरणीच्या तोंडावर बियाणांची मागणी होणार म्हणून मातोळा येथील सुरेश सदानी यांनी लाखोंचा माल भरुन ठेवला होता. चोरट्यांना बियाणांसह इतर साहित्य लंपास केले होते.
यंदाच्या खरिपात सोयाबीन आणि कापसावरच शेतकऱ्यांचा भर आहे. शिवाय हंगामाच्या सुरवातीला कापूस लागवडीवर भर दिला जातो. त्यामुळे सदानी यांनी कापसासह मका, ज्वारी बियाणे विक्रीसाठी ठेवले होते. बियाणे खतांचा भरणा करताच अशाप्रकारे चोरी झाल्याने शेतकऱ्यांची तर अडचण झालीच पण आता कृषी विभागाकडून विचारणा झाल्यावर काय उत्तर द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला होता.
बियाणांसह इतर साहित्य लंपास झाल्याने बोराखडी ठाण्याचे पोलिस गेल्या आठवड्यापासून चोरट्यांच्या मागावर होते. विशेष पथकाची नेमणूक आणि सीसीटीव्ही व गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी शेख साबीर शेख अहमद (मलकापुर) याला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्यातील इतर चार आरोपींचा अद्यापही पोलीस शोध घेत असून ते फरार आहेत.