गाई म्हशींच्या दुधातून लाखोंचा नफा, शेतकरी महिलेला मिळाले अनेक मानसन्मान

| Updated on: Jun 25, 2023 | 4:06 PM

एका महिलेचा सगळीकडं मानसन्मान होत आहे, त्याचं कारण सुध्दा तसंच आहे. त्या महिलेने घरात ५२ गाई, १० म्हशी संभाळल्या आहेत. त्यातून त्या महिन्याला लाखो रुपयांची कमाई करीत आहेत.

गाई म्हशींच्या दुधातून लाखोंचा नफा, शेतकरी महिलेला मिळाले अनेक मानसन्मान
farmer kamla devi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शेती (FARMER NEWS) करीत पशुपालन करणे अधिक फायद्याचं असल्याचं तुम्हाला अनेकांनी सांगितलं असेल. परंतु ते खरं आहे. कारण राजस्थान (RAJSTHAN) राज्यातील शाहपुरात राहणाऱ्या एका शेतकरी महिला कमला देवी यांनी म्हशी आणि गाईच्या दुधातून लाखो रुपये कमाई होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. त्यांना महिन्याला लाखो रुपयांचा फायदा होतो. त्यांच्या या चांगल्या कामासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (KAMLA DEVI VIRAL NEWS) यांनी सुध्दा सन्मानित केलं आहे. त्याचबरोबर त्यांचा मच्छी पालनाचा सुध्दा व्यवसाय आहे.

घरात ५२ गाई, १० म्हशी

कमला देवी यांच्याकडे गिर, देशी आणि हॉलिस्टन नस्ल अशा तीन जातीच्या ५२ गाई आहेत. त्याचबरोबर मुर्रा नस्ल जातीच्या १० म्हशी आहेत.५२ गाई, १० म्हशी या सगळ्याचं दिवसाचं दूध जवळपास 570 लीटर असतं. त्या दुधाची विक्री करुन पैसे कमावतात. त्याचबरोबर दुधापासून काही उत्पादन तयार करुन त्या विकतात.

कमला देवी यांच्याकडे ज्या गाई आहेत. त्या दुधासाठी अधिक प्रसिध्द आहेत. प्रत्येक गाय दिवसाला 12 ते 15 लीटर दूध देते. त्या गाईची विक्री सुध्दा लाखात असते. त्या गाईच्या एक लिटर दुधाची किंमत जवळपास 65 रुपये आहे. समजा एक गाय दिवसाला 12 लीटर दूध देते. तर ती गाय तीस दिवसात 360 लीटर दूध देते. एका वर्षात ती गाय 3 हजार 600 लीटर दूध देते. एका गाईचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख
34 हजारच्या आसपास जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

म्हशींमध्ये सगळ्यात जास्त दूध देते मुर्रा म्हैस

कमला देवी मुर्रा नस्ल जातीच्या म्हैशी सुध्दा संभाळल्या आहेत. त्या जातीच्या म्हैशीचं उत्तर भारतात अधिक पालन केलं जातं. त्या जातीच्या म्हैशी एका महिन्याला एक हजार लिटर दूध देतात. मुर्रा म्हैस संभाळणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या अधिक खाण्याकडे लक्ष देण्यास सांगितलं जातं. या जातीच्या म्हैशीपासून अधिक उत्पन्न होत असल्यामुळे भारतात ही जात अधिक प्रसिध्द आहे.