वाशिम : शेती व्यवसायात अपयशाने खचून न जाता परीश्रम आणि (Crop Change) नवनविन प्रयोगामध्ये सातत्य ठेवल्यास काय होते हे वाशिम तालुक्यातील देपूळच्या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. गेल्या दोन वर्षात (Tomato) टोमॅटोचा वावरातच लाल चिखल झाला असतानाही ऋषिकेश गंगावणे यांनी सलग तिसऱ्या वर्षी दीड एकरात टोमॅटोचा लागवडीचा प्रयोग केला होता. यंदा (Tomato Rate) टोमॅटोला असा काय दर मिळाला आहे की त्याने गंगावणे यांचे जीवनच बदलून गेले आहे. विक्रमी उत्पन्न मिळाल्यावर शेतकरी काय करु शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. टोमॅटो उतारई करण्यासाठी त्यांनी टक्क टोमॅटोच्या झाडांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. एवढेच नाही टोमॅटो झाडे जाळून न टाकता ती पाण्यात विसर्जित केली. आता नफा-तोट्याची तमा न बाळगता दरवर्षी टोमॅटो लागवड करण्याचा त्यांनी निर्धारच केला आहे.
आगोदर कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीने टोमॅटोला मार्केट मिळाले नाही तर गतवर्षी तोडणीच्या दरम्यानच पावसाने हजेरी लावल्याने वावरातच टोमॅटोचा लाल चिखल झाला होता. दरवर्षीच्या नुकसानीमुळे यंदा टोमॅटोचे उत्पादन घटले आणि इकडे बाजारात टोमॅटोचा दर शंभरीपार गेला. याच प्रतिकूल परस्थितीमध्येही गंगावणे यांनी दीड एकरात टोमॅटो लागवड केली. विक्रमी दरामुळे खर्च वजा जाता त्यांना 7 लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे दरवर्षी परस्थिती बदलते शेतकऱ्यांनी प्रयत्न आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास उत्पन्न हे मिळतेच असा विश्वास गंगावणे यांना आला आहे.
अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाल्यावर शेतकरी काय करेल याचा थांगपत्ता लागणार नाही. आता दीड एकरात 7 लाखाचा नफा म्हणल्यावर या पिकाची उतराई करण्यासाठी गंगावणे यांनी ढोल-ताशाच्या गजरात टोमॅटोच्या झाडांची मिरवणूक काढली. या उत्पादनामुळेच आपल्या जीवनात बदल झाला आहे त्याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी सबंध गावातून मिरवणूक तर काढलीच पण टोमॅटो झाडांचे पाण्यात विसर्जण केले. इतर वेळी काढणी झाली की टोमॅटोची झाडे ही फडातच जाळली जातात. पण याला फाटा देत गंगावणे यांनी या झाडांचे पाण्यात विसर्जन केले.
वाशिम तालुक्यातील देपूळ शिवारात सिंचनाची सोय असल्याने अधिकतर शेतकरी हे भाजीपाल्यावर भर देतात. मात्र, गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनामुळे निर्माण झालेली परस्थिती यामुळे शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय निवडला होता. पण गंगावणे यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यामुळे टोमॅटो उत्पादनातून हा चमत्कार घडला आहे. आता गंगावणे यांचे उत्पादन पाहून शेतकरी पुन्हा भाजीपाल्यावर भऱ देतील.टोमॅटो पासून एक हजार कॅरेटच उत्पन्न मिळालं शिवाय चांगले दर मिळाले आहेत.त्यामुळं मागील दोन वर्षात झालेलं नुकसान भरून निघालं आहे. त्यामुळे नुकसान-फायदा याचा विचार न करता आयुष्यभर दर हंगामात टोमॅटोची लागवड कऱणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.