या गावाची ओळख होतेय ऑरेंज व्हिलेज म्हणून; गावात इतक्या एकर जागेवर संत्रा लागवड

| Updated on: Feb 21, 2023 | 12:24 PM

यावर्षी यांच्या शेतातील संत्र्याच्या ४४० झाडापैकी चारशे झाडांना भरघोस संत्रा लागले आहेत. यांच्या अंदाजानुसार २८०० ते ३००० कॅरेट माल यांच्या संत्र्याचा निघेल. १९ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न या संत्र्याच्या फळबागापासून एका वर्षात मिळणार आहे.

या गावाची ओळख होतेय ऑरेंज व्हिलेज म्हणून; गावात इतक्या एकर जागेवर संत्रा लागवड
Follow us on

वाशिम : वनोजा परिसराची आता ऑरेंज व्हिलेज म्हणून ओळख निर्माण होत आहे. वनोजा परिसरात जवळपास २ हजार एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी संत्रा फळ बागेची लागवड केली. दोन एकरात १९ लाखांचे उत्पन्न काढल्यामुळे एक शेतकरी संत्र्यांमुळे मालामाल झाला आहे. वनोजा येथील अल्पभूधारक शेतकरी पुरुषोत्तम राऊत यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे. आधी ते आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तुर, हरबरा याचे पीक घेत होते. मात्र त्यांना पारंपारिक शेती करुन काहीच मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी संत्रा फळबाग लावण्याचे ठरवले. त्यांनी सात वर्षांपूर्वी आपल्या दोन एकर शेतात जंबेरी या जातीच्या ४५० संत्रा झाडाची २० बाय १२ या पद्धतीने लागवड केली. पाण्याचे योग्य नियोजन करत संत्र्यांची बाग फुलवली. त्यांनी केलेल्या कष्टामुळे फळबागेला यावर्षी चांगला बहार धरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्याकडे धाव घेत. यावर्षी ७०० रुपये कॅरेटप्रमाणे संत्राचा बगीच्या मागितला आहे. यामध्ये २८०० कॅरेट संत्रा निघेल असा अंदाज आहे.जवळपास १९ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

अकोला कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन

वनोजा परिसरातील शेतकरी संत्रा फळबागेकडे मोठ्या प्रमाणात वळलेत. शेतकऱ्यांना कृषी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. वनोजा येथे काही दिवसांपूर्वीच कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी संत्रा फळबागेविषयी मार्गदर्शन केले. वनोजा या गावांमध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. त्यामुळे येथील शेतकरी पाण्याचे योग्य नियोजन करतात. शेततळे व विहिरीत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करतात.

९० गुंठ्यात लावली ४४० झाडे

पुरुषोत्तम राऊत या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी याच्या ९० गुंठे शेतामध्ये संत्र्याचे ४४० झाडे २०१६ मध्ये लावले आहे. या झाडाची निगराणी पोटच्या लेकरासारखी केली. मागील तीन वर्षापासून या झाडांपासून हे शेतकरी उत्पन्न घेत आहेत. २०२०-२१ मध्ये राऊत यांनी तेरा लाख तीस हजाराचा आपला संत्र्याचा बगीचा विकला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी देता आली नाही. तसेच इतर घरचे काम असल्यामुळे संत्राच्या झाडावर पाहिजे तेवढे लक्ष देता आले नाही. त्यामुळे २०२१-२२ मध्ये संत्र्याच्या झाडाला कमी फळधारणा झाली.

९० गुंठे जागेतून तीन वर्षांत ३५ लाख

यावर्षी यांच्या शेतातील संत्र्याच्या ४४० झाडापैकी चारशे झाडांना भरघोस संत्रा लागले आहेत. यांच्या अंदाजानुसार २८०० ते ३००० कॅरेट माल यांच्या संत्र्याचा निघेल. यावर्षी एका कॅरेटचा रेट ७०० रुपये असल्यामुळे यांना अंदाजे एकूण १९ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न या संत्र्याच्या फळबागापासून एका वर्षात मिळणार आहे. मागील तीन वर्षांमध्ये राऊत यांना ९० गुंठे जमिनीमध्ये ३५ लाख ७० हजार रुपयांचे भरघोस उत्पन्न या संत्रा या फळबागापासून मिळालेले आहे.