टोमॅटो विक्रीकरीता बाऊन्सर ठेवण्याची वेळ, कुठे घडला प्रकार

| Updated on: Jul 09, 2023 | 5:33 PM

टोमॅटोच्या किंमतीनी उच्चांक गाठला आहे. टोमॅटोच्या भावात पाच पट वाढ झाली आहे. या वाढत्या भाववाढीमुळे आता दुकानदारांनी आपल्याला दुकानात ग्राहकांनी गर्दी आवरण्यासाठी बाऊन्सर पदरी ठेवले आहेत.

टोमॅटो विक्रीकरीता बाऊन्सर ठेवण्याची वेळ, कुठे घडला प्रकार
tommatos price hike
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : उशीरा आलेला पाऊस आणि बदलेल्या निसर्गचक्रामुळे टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. भाजीपाला पिकविणाऱ्या उत्तरेकडील राज्यात कुठे ढगफूटी, कुठे अतिवृष्टीमुळे अशा बदलेल्या निसर्गचक्रामुळे टोमॅटो, आलं आणि पालेभाज्याचे भावाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे काही राज्यात तर टोमॅटोज विक्रीसाठी बाऊन्सर नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे काही ठिकाणी तर मोबाईल खरेदीवर आता टोमॅटो कॉम्पलीमेंटरी देऊ लागल्याचे चित्र आहे.

आमच्या दुकानात टोमॅटो असल्याने आम्हाला बार्गेनींग नको आहे. भाव प्रचंड जास्त असल्याने ग्राहक अंगावर येत आहेत. त्यामुळे टोमॅटो तसेच आपल्या सुरक्षेसाठी हा खर्च करावा लागत आहे. टोमॅटो आमच्या येथे 160 रुपये किलो आहेत, परंतू लोक केवळ 50 किंवा 100 ग्रॅम टोमॅटो घेत असल्याने वाद होत असल्याने बाऊन्सर म्हणून आम्ही काही माणसे उभी केली असल्याचे उत्तरप्रदेशच्या वाराणसी येथील भाजीपाला विक्रेते अजय फौजी यांनी सांगितल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मध्य प्रदेशच्या अशोक नगरातील स्मार्टफोन विक्रेत्यांनी एक आकर्षक ऑफर दिली आहे. या ऑफर नूसार जर तुम्ही मोबाईल विकत घेतला तर तुम्हाला कॉम्पलीमेंटरी म्हणून हेडफोन न देता दुकानदार टोमॅटो देत असल्याने दुकानात गर्दी वाढल्याचे एक विक्रेते अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले. जे मोबाईल फोन खरेदी करतील त्यांनी दोन किलो टोमॅटोची मोफत भेट दिली जात आहे. त्यामुळे मोबाईलच्या विक्रीत वाढ झाल्याचेही अग्रवाल यांनी सांगितल्याचे हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

टोमॅटोच्या भावात पाचपट वाढ 

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्यावतीने टोमॅटोची सरासरी किंमत सध्या शंभर रुपये किलो झाली आहे. परंतू काही ठीकाणी ती यापेक्षा जादा किंवा किंचित कमी असू शकते. अनुक्रमे दिल्ली – 127 रु., लखनऊ -105 रु., चेन्नई – 105 रु. आणि दिब्रुगड येथे 115 रु. किलो टोमॅटोचा भाव असल्याचे सांगण्यात येते. साधारणपणे उत्पादन कमी होत असल्याने दरवर्षी साधारणपणे जून आणि जुलै महिन्यात टोमॅटोचे दर दरवर्षी वाढतात. यंदा त्यात पाचपट वाढ झाली आहे.

टोमॅटोचे दर कमी होतील ? 

बदलते हवामान, सुपरजॉय चक्रीवादळ, पावसाचे आगमनाची बदलली वेळ आदींचा प्रभाव भाजीपाल्याच्या लागवडीवर झाला आहे. कुठे उष्णतेची लाठ, कुठे ढगफुटी अशा विचित्र तापमानाने भाजीपाल्याच्या पिकांना पोषक वातावरण मिळेणासे झाले आहे. साल 2023 च्या सुरुवातीला टोमॅटोचे भाव 22 रुपये किलो होते. पंधरवडा किंवा महिनाभरात उत्पन्न वाढल्यास टोमॅटोचे दर कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.