पुणे : पुण्यात राहणारे सत्यजित आणि अजिंक्य हे दोन भाऊ. त्यांनी आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारला. युवकांसाठी प्रेरणास्थान झाले. टू ब्रदर्स ही त्यांची कंपनी ४ मिलीयन डॉलर्सचा टर्नओव्हर करत आहे. वार्षिक १२ कोटींचा व्यवसाय करते. सत्यजित आणि अजिंक्य यांनी कंपनी बनवण्यासाठी बँकेतील नोकरी सोडली. २०१४ मध्ये पुण्याजवळ भोदानी गावात टू ब्रदर्स सेंद्रीय शेती नावाने सेंद्रीय शेती सुरू केली. पूर्णवेळ शेतीत उतरण्याचा संकल्प केला.
अजिंक्य कम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर आहे. इंदिरा कॉलेज पुणे येथून त्यांनी एमबीए केलं आहे. त्यानंतर त्यांनी एचडीएफसी आणि एचएसबीसी यासारख्या कंपन्यांमध्ये ४ वर्षे बँकेत काम केलं. त्यांचे मोठे भाऊ सत्यजित अर्थशास्त्रात बी. ए. आहेत. त्यांच्याकडेही एमबीएची डिग्री आहे. सत्यजित यांनी सुमारे दहा वर्षे बँकिंग क्षेत्रात कोटक लाईफ इन्शूरन्स, सिटीकार्प फायनन्स आणि डीबीएससारख्या कंपन्यांमध्ये काम केलं.
सत्यजित आणि अजिंक्य टू ब्रदर्सच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या पद्धती सांगतात. मशीनचा वापर न करता अधिक उत्पादन कसं घेतलं जाऊ शकते, हे सांगतात. दोघेही भाऊ शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करायला सांगतात. यातून शेतकऱ्यांना फायदा होतो.
टू ब्रदर्स हे एक ऑनलाईन वस्तू विक्री करण्याचे माध्यम आहे. तूप, मुंगफल्ली, मुंगफल्लीचा तेल, पारंपरिक गव्हाची कणीक विक्री करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं त्यांच्याशी जुळले आहेत.
सेंद्रीय शेती क्लब सुरू करण्यासाठी त्यांनी पुण्यातील शाळांमध्ये कार्यक्रम सुरू केला. ९ हजार शेतकरी त्यांच्यापासून प्रेरित झाले. दोन्ही भावांनी बऱ्याच शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीची पद्धती समजावून सांगितली. आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, असं सत्यजित यांचं म्हणणं आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी याचा विचार करायला हवा. शेतीतूनही चांगले उत्पन्न काढता येऊ शकते. यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला हवी.