ही कसली दुश्मनी ? 35 एकरातील साठवलेल्या तुरीच्या गंजीची अज्ञातांकडून होळी, लाखोंची नुकसान

| Updated on: Jan 20, 2022 | 12:34 PM

अथक परिश्रम आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या तुरीची काढणी करुन आता उद्या मळणी म्हणताच काही अज्ञातांनी तुरीची गंजीच पेटवून दिल्याचा प्रकार महागाव मधील तुळशीनगर भागात घडला आहे. 35 एकरातील तुरीची कापणी करुन संजय जानुसिंग राठोड यांनी साठवणूक केली होती.

ही कसली दुश्मनी ? 35 एकरातील साठवलेल्या तुरीच्या गंजीची अज्ञातांकडून होळी, लाखोंची नुकसान
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील शेतकरी संजय जानुसिंग राठोड यांच्या तुरीच्या गंजीला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Follow us on

यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. वर्षभराची मेहनत आणि पिकावर केलेला खर्च अवकाळीमुळे पाण्यात गेला आहे. असे असताना अथक परिश्रम आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या तुरीची काढणी करुन आता उद्या मळणी म्हणताच काही (unidentified thieve) अज्ञातांनी तुरीची गंजीच पेटवून दिल्याचा प्रकार (Yawatmal) महागाव मधील तुळशीनगर भागात घडला आहे. 35 एकरातील तुरीची कापणी करुन संजय जानुसिंग राठोड यांनी साठवणूक केली होती. या 35 एकरात जवळपास 80 क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकऱ्यास अपेक्षित होते. पण अज्ञातांनी केलेल्या प्रकारामुळे राठोड यांनी (Toor Crop) तुरीच्या गंजीच्या ठिकाणी तुरीची राखच पाहवयाची नामुष्की ओढावली होती. एकीकडे नैसर्गिक संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे तर दुसरीकडे अशा घटना समोर येत आहेत. बुधवारी सकाळी गंजीची अवस्था पाहून जो-तो एकच म्हणत होता ही कसली दुश्मनी?

35 एकरातील तुरीची गंज

एकतर अवकाळी पावसामुळे तुरीची कापणी लांबणीवर पडली होती. प्रतिकूल परस्थितीमध्ये संजय राठोड यांनी मजूर लावून 35 एकरातील तुराची कापणी केली. शिवाय यंत्राच्या सहायाने मळणी करण्याच्या हिशोबाने गंजही लावली. मात्र, मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी या गंजीला आग लावली. सध्याच्या बाजारभावानुसार 3 ते 4 लाखाचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी यांनी केला आहे. वातावरणातील बदलामुळे पीक जोपासण्यासाठी अधिकचा खर्चही झाला होता. शिवाय तुरीचे दर वाढत असल्याने राठोड यांना झालेला खर्च तरी पदरी पडेल अशी आशा होती. पण शेतातील हे चित्र पाहून त्यांना धक्काच बसला.

दोन दिवसांनीच होती मळणी

अधिकचे क्षेत्र असल्याने गेल्या 8 दिवसांपासून कापणीचे काम सुरु होते. शिवाय आता पावसाने उघडीप दिल्याने दोन दिवसांमध्ये यंत्राचे सहायाने ते मळणी करणार होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदल आणि अवकाळी यामुळे शेतीकामे रखडली होती. आता कुठे वातावरण निवळले होते. एवढे दिवस निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत त्यांनी पिकांची जोपासणा केली पण अज्ञातांनी केलेल्या या घटनेतून राठोड तुरीचे पीक वाचवू शकले नाहीत.

तक्रार दाखल, मदतीची अपेक्षा

सदरील घटना निदर्शनास आल्यानंतर संजय जानुसिंग राठोड यांनी महागाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. या घटनेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. त्यामुळे राठोड यांचे दुहेरी नुकसान झाले असून पोलीसांनी या घटनेतील आरोपींना जेरबंद करण्याची मागणी केली आहे तर नुकसानभरपाई देण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Positive News: तीन महिन्यात 150 लाख टन साखरेचे उत्पादन, महाराष्ट्राचा किती वाटा ? वाचा सविस्तर

Rabi Season : वातावरण निवळले, शेतकऱ्यांनो लागा कामाला, पीक संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

राज्यात रेशीम कोषचे विक्रमी उत्पादन अन् दर्जाही सर्वोत्तम, कशामुळे बदलले चित्र? वाचा सविस्तर