परभणी : गेल्या चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं नुकसान झालं. पण, सर्वाधिक नुकसान परभणी जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळते. नुकसानीचे पंचनामे करताना दिसतात. ज्वारीचं पीक आडवं झालंय. गारपिटीने टरबूज गळून पडलं. गेल्या चार दिवसांपासून परभणीत अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. एक नुकसानग्रस्त शेतकरी म्हणाला, कडगाव येथे अतिरिक्त गारपीट, वारा, पाऊस यामुळे ज्वारी, गहू, टरबूज फळबागा यांचं भरपूर नुकसान झालं.
सरकार आम्हाला काही देत नाही. सरकार आम्हाला गहू, ज्वारी, रेशन देईल. पण, जनावरांना लागणारा ज्वारीचा कडबा कुठून आणणार, असा सवाल केला. यावेळी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी होते. आमचं प्रचंड नुकसान झालं. हात जोडून सरकारला विनंती आहे. आम्हाला मायबाप तुम्ही जीवंत करा. कारण आम्ही शेतकरी मेल्यासारखे झाले आहोत. काहीतरी मदत द्यावी, अशी सरकारला विनंती आहे.
गोविंद अबदागिरे नावाच्या तरुण शेतकऱ्याने आपली आपबिती सांगितली. तो म्हणाला, माझ्या गव्हाच्या प्लाटचे अतोनात नुकसान झाले. माझी शिंदे साहेबांना विनंती आहे. गव्हाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
परभणीच्या जिल्हाधिकारी आँचल गोयल म्हणाल्या, १७ आणि १८ तारखेला गारपीट झाली. भूईमुंग, ज्वारी, गहू यांचं मोठं नुकसान झालं आहे. तलाठी आणि कृषी सहाय्यक हे फिल्डवर आहेत. ते पंचनामे करत आहेत. कुणी संपावर असो की, नसो पंचनाम्याच्या कामातून कुणालाही सुटका नाही.
परभणी जिल्ह्यात गेली चार दिवस अवकाळी पाऊस वादळी वारे आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात 3275 हेक्टरवर नुकसान झाल्याची प्राथमिक प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. दरम्यान, कालपासून पावसाने उघडी घेतली. आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून. जिल्हाधिकारी आंचाल गोयल यांनी पांचनाम्यावर संपाचा पंचनामावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं.