Unseasonal Rain : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, रब्बी पिकांना बसणार फटका, विटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान

| Updated on: Mar 18, 2023 | 11:29 AM

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर अनेक जिल्ह्यात वीज पडल्यामुळे दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. अजून काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Unseasonal Rain : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, रब्बी पिकांना बसणार फटका, विटभट्टी व्यावसायिकांचे  मोठे नुकसान
rain
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गोंदिया : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज सकाळच्या सुमारास गोंदिया (Gondia) जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानकपणे अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावल्यान बळीराजा धास्तावलेला असून या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे. अवकाळी पावसाने झोडपल्याने पोपट, जवस, मूंग, गहू, आदी पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच विटभट्टी व्यावसायिकांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे. मागच्या आठदिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. शेतीसह (Farmer) अनेक व्यवसायिकाचं नुकसान झालं आहे.

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

लातुर जिल्ह्यातल्या अनेक भागात पाऊस कोसळला आहे. विजांच्या कडकडाट आणि वाऱ्यासह पाऊस झाला आहे. लातुर शहरात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. जिल्ह्यातल्या उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, औसा, निलंगा तालुक्यात पाऊस झाला. चाकूर तालुक्यातल्या हटकरवाडी शिवारात वीज पडून म्हैस दगावली आहे. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आंबा फळांचेही नुकसान झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते, सायंकाळी पाऊस झाल्याने वातावरणात गारठा पसरला आहे.

अमरावतीच्या मेळघाट मधील हरिसाल भागात गारपीट

हवामान विभागाने राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा दिला आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. काल सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या मेळघाट मधील हरिसाल भागात काल गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. या पावसामुळे हरभरा, गहू आदि पिकांच नुकसान झालं आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर अनेक जिल्ह्यात वीज पडल्यामुळे दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. अजून काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाच्यावेळी गरज असल्यास घरातून बाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.