महाराष्ट्र : महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात मागच्या आठदिवसांपासून पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यात मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागात अजिबात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी (farmer) वर्ग मोठ्या चिंतेत आहे. कारण जूनच्या महिन्यात ज्या पध्दतीने पाऊस व्हायला हवा होता. त्यापद्धतीने पाऊस झालेला नाही. राज्याच्या अनेक भागात पावसाने ओढ दिली असली तरी, सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून असल्यामुळे आदिवासी शेतकरी (farmer news) सुखावला आहे. सध्या आदिवासी भागातील शेतीही पावसाने तुडुंब भरली असून पावसाअभावी करपू लागलेल्या भातसाळीच्या रोपांनाही जीवदान मिळालं आहे.
वाशिममध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. टोमॅटो 120 रुपये, हिरवी मिरची 160 रुपये प्रति किलो आणि कोथिंबीर 50 रुपये जुडीने विकल्या जात आहेत. बाजारात फुल कोबी, भेंडी, दोडकी आणि वांग्याचा दर 80 रुपये प्रति किलो झाला आहे. काही दिवसांनंतर भाजीपाला आणखी महाग होणार आहे.
मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या महिन्यात टोमॅटो २० रुपये किलो होता. सध्या टोमॅटोचा दर १०० रुपये किलो झाला आहे. विशेष म्हणजे काही शहरात १२० रुपये किलो टॅमोटो मिळत आहे. मान्सून महाराष्ट्रात उशीरा दाखल झाल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे.
टोमॅटो – 80 ते 120 रुपये किलो
भेंडी – 40 रुपये किलो
दुधीभोपळा – 40 रुपये किलो
कोबी – 50-60 रुपये किलो
कारले – 50-60 रुपये किलो
शिमला मिरची – 50 ते 60 रुपये किलो
वांगी – 30 रुपये किलो
हिरवी मिरची – 60 रुपये किलो
लिंबू – 60 रुपये किलो
अदरक – 250 रुपये किलो
देशात अनेक ठिकाणी मान्सून वेळेत दाखल झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला करपून गेला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. सध्या भाव अधिक वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा अधिक फटका बसला आहे.
सध्या भाज्याचे वाढलेले दर कमी करण्यासाठी सरकार पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढच्या पंधरा दिवसात टोमॅटोची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव, रोहित कुमार सिंग यांनी हिमाचल प्रदेशातील सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमधून या दोन जिल्ह्यामधून टोमॅटोचा चांगला पुरवठा झाल्यानंतर दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किमती लगेच खाली येतील. त्याचबरोबर केंद्र सरकार किमती कमी करण्यासाठी उपाय शोधत आहे.