Vegetables Price : टोमॅटो नंतर लसून २०० रुपये किलो, भाजीपाल्यांचे दर वाढल्यामुळे….

| Updated on: Aug 05, 2023 | 9:48 AM

Vegetables Price in Mumbai : मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्यांवर चांगलाचं झाला आहे. मागच्या काही दिवसात भाजीपाल्यांचे दर हिशोबाच्या बाहेर असल्याचे नागरिक सांगत आहेत. लसूण 180 ते 200 रुपये किलो दराने विकला जात आहे.

Vegetables Price : टोमॅटो नंतर लसून २०० रुपये किलो, भाजीपाल्यांचे दर वाढल्यामुळे....
Tomato Rate Today
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निवृत्ती बाबर, मुंबई : मागच्या आठवड्यातील मुसळधार पावसाचा (heavy rain) फटका मुंबईमध्ये भाजीपाल्यांच्या दरांवर (Vegetables Price in Mumbai) झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही ठिकाणी महत्त्वाच्या बाजारात काही भाजीपाल्यांचे दर चांगलेचं वाढले आहेत. तर काही भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. मागच्या महिन्यापासून संपूर्ण देशात टोमॅटोचे दर (tomato rate increased) गगनाला भिडलेअसल्याचे पाहायला मिळाले आहे. २०० रुपयाच्या वरती जाऊन टोमॅटो विकले जात आहेत. मुंबईत सुध्दा भाजीपाल्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना घर चालवणं अवघड झालं आहे.

लसून मागच्या आठवड्यात १०० रुपये किलो दराने बाजारात विकला जात होता. सध्या लसणाचा दर 180 ते 200 रुपये किलो झाला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर यापुढे देखील अशा पद्धतीने दर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

भाज्यांचे दर खालीलप्रमाणे

टोमॅटो – 150 रुपये पहिले 110 ते 120
भेंडी – 60 रुपये ते 70 पहिले 80
कारले – 60 रुपये पहिले 70
शिमला मिरची – 60 रुपये पहिले 80
कोबी – 40 रूपये पहिले 50 ते 60
फ्लावर – 60 रुपये पहिला 60
दुधी – 50 पहिले 60
मिरची – 80 पहिले 60
बिट – 40 स्थिर
भोपळा – 30 स्थिर

हे सुद्धा वाचा

संपूर्ण जुलै महिन्यात महाराष्ट्रातील अधिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. बाजारात कमी प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत असल्यामुळे दर अधिक वाढले आहेत. जोपर्यंत बाजारात भाजीपाल्याची आवक वाढणार नाही. तोपर्यंत भाजीपाल्यांचे दर असेच वाढत राहणार असंही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

टोमॅटो देशातील अनेक मोठ्या शहरात २०० रुपयांच्या पलिकडे जाऊन विकला जात आहे. केंद्र सरकारने टोमॅटो खरेदी करुन काही महत्त्वाच्या शहरात टोमॅटो कमी दरात विक्री करण्यास सुरुवात केली आहे.