Untimely Rain: अवकाळी, गारपिटीचा सर्वाधिक फटका विदर्भाला, काय सांगतो कृषी विभागाचा अहवाल?

| Updated on: Jan 13, 2022 | 1:04 PM

महिन्याच्या अंतराने अवकाळी पाऊस हा ठरलेलाच. हे कमी म्हणून की काय यावेळी तर विदर्भात अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. मध्यंतरी झालेल्या अवकाळी आणि गापिटीने सर्वाधिक नुकसान हे विदर्भातील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल 35 हजार हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून अद्यापही आढावा घेतला जात आहे.

Untimely Rain: अवकाळी, गारपिटीचा सर्वाधिक फटका विदर्भाला, काय सांगतो कृषी विभागाचा अहवाल?
जानेवारी महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Follow us on

नागपूर: उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रय़त्न केले. (Rabbi Season) रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण असल्याने पारंपारिक पिकांना बाजूला सारत (Farmer) शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला होता. खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी वेळोवेळी फवारणी, कृषी विभागाचा सल्ला आदी बाबी केल्या जात होत्या. मात्र, शेतकऱ्यांचे प्रयत्न आता ठप्प झाल्याचे चित्र आहे. महिन्याच्या अंतराने अवकाळी पाऊस हा ठरलेलाच. हे कमी म्हणून की काय यावेळी तर (Vidarbh) विदर्भात अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. मध्यंतरी झालेल्या अवकाळी आणि गापिटीने सर्वाधिक नुकसान हे विदर्भातील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल 35 हजार हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून अद्यापही आढावा घेतला जात आहे.

शेतामध्ये पाणी, पिके भुईसपाट

विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यातही अवकाळीचा तडाखा बसलेला आहे. नागपूर ग्रामीण, पारशिवनी, कामठी, रामटेक आणि सावनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात फटका बसला. बुधवारला कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक आढावा घेतला. सर्वाधिक नुकसान हे पारशिवनी आणि कामठी तालुक्यात झाल्याचे कृषी विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा प्राथमिक आढावा घेतला. त्यामध्ये शेतातील पीक भुईसपाट झाल्याचे दिसून आले. यामध्ये हरभरा, गहू, भाजीपाला आणि खरीप तुर आदी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

वर्धा-अमरावती जिल्ह्याचा नुकसानीचा अहवाल शासन दरबारी

कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यातील 19 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचा समावेश आहे तर खरिपातील तूर आणि कापसाचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अवकाळी आणि गारपिटमुळे 322 हेक्टरावरील संत्रा बागेचे नुकासान झाले आहे.

वर्धा : अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला असून आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती मदतीची. जिल्ह्यात 8 आणि 9 जानेवारी रोजीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे 3 हजार 54 हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून 33 टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे.

संबंधित बातम्या :

Onion : दरामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे लाल कांद्याचा झाला वांदा, हंगामाची सुरवात अन् शेवटही अडचणीचाच

Farmer: अवकाळीमुळे सर्वकाही व्यर्थ मात्र, चंद्रपुरात कृषी विभागाचा चक्रावून टाकणारा दावा

Farmer Advice: वाढलेली हुडहुडी अन् घटलेल्या तापमानाचा रब्बी पिकांवर परिणाम, कृषी विज्ञान केंद्राचा काय आहे सल्ला?