वाशिम : विदर्भ (Vidarbha) म्हटल की, लोकांच्यासमोर येते ती नापिकी, कर्जबाजारीपणा, निसर्गाचा भरवसा नसणारी शेती आणि शेतकरी (Farmer) आत्महत्या. मात्र, सध्या विदर्भातील शेतकरी प्रत्येकवेळी नवनवीन प्रयोग करीत असल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन देखील घेतले आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना कधी चांगले दिवस येतील आणि कधी वाईट दिवस येतील हे कोणीच सांगू शकत नाही. अनेकदा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक शेतकरी (washim agriculture news) शेतात नवनवीन प्रयोग करतान दिसत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील अल्पभूधारक शेतकरी पुरूषोत्तम राऊत यांनी एक नवा प्रयोग केला आहे. पूर्वी ते आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तुर, हरबरा ही पीकं घेत होते. मात्र त्यांना पारंपारीक शेती करुन काहीच फायदा होत नव्हता. त्यामुळे त्यांनी संत्रा फळबाग लावण करण्याचं ठरवलं. त्यांनी सात वर्षांपूर्वी आपल्या दोन एकर शेतात जंबेरी या जातीच्या ४५० संत्रा झाडाची २० बाय १२ या पद्धतीने लागवड केली.
पाणी कमी असताना सुध्दा उत्तम नियोजन आणि अहोरात्र कष्ट करत संत्र्यांची बाग त्यांनी फुलवली आहे. त्यांनी केलेल्या कष्टामुळे फळबागेला यावर्षी चांगला बहार आला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडे धाव घेत. ७०० रुपये कॅरेट प्रमाणे संत्राचा संपुर्ण बगीचा मागितला आहे. यामध्ये २८०० कॅरेट संत्रा निघेल असा अंदाज असून, जवळपास १९,६०,००० रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी त्यांनी व्यक्त अपेक्षा आहे.
वनोजा परीसराची आता ओंरेज व्हिलेज म्हणून ही ओळख निर्माण होत आहे. वनोजा परिसरात जवळपास २ हजार एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी संत्रा फळ बागेची लागवड केली असून, शेतकरी त्यापासुन लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे परिसरातील इतर शेतकरी सुध्दा संत्रा फळबागेकडे वळताना दिसत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. वनोजा येथे काही दिवसांपूर्वीच कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी संत्रा फळबागेविषयी मार्गदर्शन केले आहे.
वनोजा या गावांमध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचा स्त्रोत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची योग्य नियोजन करून व शेततळे व विहिरी त्यानुसारच पाण्याचा योग्य वापर करून मोठ्या प्रमाणात फळबागा फुलवल्या आहेत. अशातच पुरुषोत्तम राऊत या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी याच्या ९० गुंठे शेतामध्ये संत्र्याचे ४४० झाडे २०१६ मध्ये लावलेले आहे. या झाडाची निगराणी पोटच्या लेकरासारखी करून मागील तीन वर्षापासून या झाडांपासून हे शेतकरी उत्पन्न घेत आहेत. २०२०-२१ मध्ये राऊत यांनी तेरा लाख तीस हजाराचा आपला संत्र्याचा बगीचा विकला होता. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जर योग्य पाण्याचा वापर करून आपल्या शेतामध्ये अशाच संत्रा बागा जगवल्या किंवा लावल्या तर यांना लखपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.