नंदुरबार : उत्तर महाराष्ट्र आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मार्च महिन्याचा पहिल्याच आठवड्यात वाढलेले तापमान (Temprature) पपई आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. वाढत्या तापमानामुळे केळी आणि पपईचे फळे खराब होण्याची संभावना वाढली आहे. फळाच्या संरक्षणासाठी शेतकरी विविध उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात तापमान चाळीस अंश सेल्सियस तापमानाच्या जवळपास गेल्याने पपई आणि केळीचे फळे खराब होण्याची शक्यता वाढली आहे. त्यासोबत विषाणूजन्य रोगांमुळे केळी आणि पपईच्या बागांमध्ये (cutivativatin fruit) मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन फळे उघडे पडण्याच प्रमाण वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे केळी आणि पपईच्या फळांवर कापड आणि गोणपाट टाकत फळे झाकत असून फळावर टाकलेल्या आच्छादनामुळे उष्णताची तीव्रता कमी होऊन फळांच्या संरक्षण होत आहे.
वाशिमच्या वाडी रायताळ, मोहोजा इंगोले, किनखेडा, मोरगव्हाण सह अनेक ठिकाणी 7 फेब्रुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळं कांदा पीकाचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळं शेतकरी हवालदिल झाले असून कांदा बीज नुकसानीचे दोन दिवस झाले पंचनामे केले नसून त्याचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे करीत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात 4479 हेक्टरवरील पिकांना ‘अवकाळी’ चा तडाखा बसला आहे. यामुळे 8 हजार 791 शेतकरी बाधित झाले असून सर्वाधिक नुकसान हे राहुरी, नेवासा तालुक्यात झालं आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने सोमवार आणि मंगळवारी असे दोन दिवस अनेक भागात हजेरी लावली. जिल्ह्याच्या उत्तर भागात अवकाळीचा मोठा तडाखा बसला. रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, टोमॅटो, कांदा, कोबी, संत्रा, आंबा या पिकांचे नुकसान झालं आहे.
राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि दाट धुके व गारपीटाने तडाका दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. परंतु आता राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार आहे, राज्यातील तापमान चार ते सहा अंश सेल्सिअस ने वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 9 मार्च रोजी कोकणात उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने तब्बल दहा हजार शेतकऱ्यांच नुकसान केले आहे. जिल्ह्यातील 149 गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, यात हजारो हेक्टर शेत जमिनीचे पिकं उद्धवस्त झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. यात सर्वाधिक नुकसानी साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये झाल्याच समोर आले आहे. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पंचानामे करत हा प्राथमिक अहवाल तयार केलेला आहे.
गेल्या तीन दिवसात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने नाशिक जिल्ह्यातील जवळपास चार हजार हेक्टर पिकांचे नुकसान केले आहे. साडेपाच हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. 3141 हेक्टरवरील बागायती क्षेत्र, तर 1013 हेक्टरवरील बागायती फळपिकांचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक 2433, सिन्नर 510, चांदवड 245, तर येवला येथील 863 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.