पुणे : ऐन संक्रातीच्या सणाच्या दरम्यानच तीळाची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सणात मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी ( Sesame price) तीळाचे दर मात्र, नियंत्रणातच असतात. पण यंदाचे चित्र हे वेगळे आहे. कारण बदलत्या (Climate Change) वातावरणाचा परिणाम तीळाच्या उत्पादनावरही झालेला आहे. हवामानातील बदलामुळे तीळाच्या उत्पन्नामध्ये 25 टक्के घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सणात वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे दर हे तेजीतच राहणार आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये तीळाच्या दरात 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. ती कायम राहून अणखीन दर वाढतील का हेच पहावे लागणार आहे.
हवामातील बदलाचा परिणाम प्रत्येक पिकांवर झालेला आहे. त्याच प्रमाणे तीळ उत्पन्नामध्ये काही प्रमाणात का होईना घट ही झालेली आहे. शिवाय जे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे ते ही दर्जेदार नाही. पावसामुळे तीळ हलका आणि कमी दर्जाचा, डागी तीळाचे उत्पादन जास्त निघाले आहे. असे असले तरी वाढत्या मागणीमुळे दर हे टिकून आहेत. तीळापेक्षा इतर पिकांची उत्पादकता ही अधिकची असते. मुळात तीळाचे एकरी उत्पन्न हे कमी असते तर यंदा अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे ते अधिकच कमी झाले आहे.
बदलत्या शेती पध्दतीमुळे दिवसेंदिवस शेती उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. गतवर्षी देशात तीळाचे उत्पन्न हे 4 लाख 39 हजार 75 मेट्रीक टन झाले होते. शिवाय गतवर्षीपेक्षा यंदा अधिकच्या क्षेत्रावर हे पीक असूनही केवळ अनियमित पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे तब्बल 8 लाख मेट्रीक टन उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम आता वर्षभर दरावर राहणार आहे.
वर्ष तीळ उत्पादन मेट्रिक टन
2014-15 8,27,839
2015-16 8,50,070
2016-17 7,47,030
2017-18 7,55,430
2018-19 6,89,310
2019-20 5,13,750
2020-21 6,39,075
2021-22 3,25,000
महिना एक किलोचे दर
जुलै 95 – 125 रुपये
ऑगस्ट 100 – 130 रुपये
सप्टेंबर 110 – 140 रुपये
ऑक्टोंबर 125 – 160 रुपये
नोव्हेंबर 130 – 165 रुपये
डिसेंबर 130 – 170 रुपये
Solapur : 1 हजार 54 ट्रक अन् 1 लाख 5 हजार क्विंटल कांदा बाजारपेठेत, कशामुळे झाली विक्रमी आवक?
Seed Production : हवामानातील बदलाचा परिणाम बिजोत्पादनावर, महाबीजकडून ‘या’ पर्यायाचा अवलंब