पुणे : 15 ऑक्टोंबर रोजी राज्यात (Sugarcane Sludge) ऊस गाळपाला सुरवात झाली होती. पावसामुळे इतर पिकांचे नुकसान झाले असले तरी सर्वात मोठे नगदी पीक असलेल्या ऊसाला यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नव्हता. उलट जिरायत क्षेत्रावरील ऊसाचे उत्पादन या अधिकच्या पावसामुळे वाढलेले होते. आता हंगाम सुरु होऊन चार महिने पूर्ण होत आहे. (Western Maharashtra) पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय (Marathwada) मराठवाड्यातील काही भाग वगळता हा हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या चार महिन्याच्या दरम्यान, 197 साखर कारखान्याच्या माध्यमातून 750 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. या माध्यमातून 755 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा अपेक्षित हंगाम झाला असून शेतकऱ्यांना कसा लाभ अधिक मिळेल या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात आले होते.
ऊस लागवडीच्या काळानुसार कारखान्याचे गाळप हे सुरु असते. त्यामुळे 31 मार्चपूर्वी 100 तर 30 एप्रिलपूर्वी 80 साखर कारखाने हे आपले गाळप बंद करतील. तर उर्वरीत साखर कारखान्यांची धुराडी ही 20 मे पर्यंत सुरु राहणार आहे. त्या विभागात किती ऊस तोडणीचा राहिलेला आहे. यानुसार कारखान्याचा कालावधी निश्चित होत असतो. यंदा मध्यंतरीच्या अवकाळी पावसाचा व्यत्यय सोडला तर हंगाम कायम सुरु राहिलेला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील तोडणी अजूनही सुरुच आहे. त्यामुळे तेथील परस्थितीनुसार हंगाम बंद होणार आहे.
साखर कारखान्यांना परवानगी देताना विशेष काळजी घेण्यात आली होती. विशेषत: संबंधित साखर कारखान्याने जर एफआरपी अदा केली नाही तर परवानगी नाही अशी भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली होती. मात्र, दरम्यानच्या काळात अनेक साखर कारखान्यांनी ही रक्कम अदा करुन साखर कारखाने सुरु केले. मात्र, राज्यातील 246 साखर कारखान्यांपैकी 46 साखर कारखाने हे हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही बंदच राहिलेले आहेत. त्यामुळे गाळप पूर्ण करण्याचे मोठे अव्हान होते. मात्र, योग्य नियोजनामुळे सर्वकाही शक्य झाले आहे.
ऊस गाळप हंगाम हा अंतिम टप्प्यात आला म्हणजे गाळप संपले असे नाही. अजूनही मराठवाड्यातील जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ऊस तोडणी बाकी आहे. त्यामुळे ज्या भागातील गाळप अंतिम टप्प्यात आहे तेथीलच गाळप बंद होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांचा ऊस वावरातून कारखान्यावर आणल्याशिवाय गाळप हे बंद होणार नसल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.
पीएम किसान योजनेतील निधीचा ‘असा’ हा उपयोग, अमरावतीमध्ये 22 कोटी 75 लाखांचा 10 हप्ता
Grape : शेतकऱ्यांची मंदीत संधी, संकटावर मात करुन अखेर द्राक्षांची निर्यात