सोलापूर : गत महिन्यात दोन वेळा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली होती. लासलगावपाठोपाठ कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ अशी (Solapur) सोलापूरची ओळख मात्र, मुख्य बाजारपेठेलाही मागे टाकत या बाजार समितीमध्ये एकाच दिवशी 1 लाख 26 हजार क्विंटल (Onion Arrival) कांद्याची आवक झाली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी ही बाजारपेठ मध्यवर्ती असली तरी याशिवाय अनेक विविध कारणे आहेत ज्यामुळे कांद्याची विक्रमी आवक होत आहे. असे असतानाही सरासरीच्या (Onion Rate) तुलनेत दर या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मिळालेला आहे. गेल्या महिन्यातला सर्वोच्च दर 2600 तर सर्वात कमी दर हा 1350 एवढा राहिला आहे. लासलगावपेक्षाही अधिकचा कांदा यंदा सोलापूर मार्केटमध्ये यंदा दाखल झाला आहे. सोलापूर कांदा मार्केटमध्ये नवी ओळख निर्माण करीत आहे.
कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वाढीव दराची कायम अपेक्षा राहिलेली आहे. हाच उद्देश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार पेठेत साध्य होत आहे. इतर बाजार समितीच्या तुलनेत अधिकचा दर आणि ज्या दिवशी कांद्याचा काटा होतो त्याच दिवशी शेतकऱ्यांना पैसेही मिळतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कर्नाटकातून शेतकरी कांदा विक्रीसाठी सोलापूर जवळ करीत आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्यातच आवक वाढत असते पण पावसामुळे यंदा कांदा लागवड लांबणीवर पडली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात कांद्याची आवक कमी झाली पण सध्या आवक ही वाढलेली आहे.
वातावरणातील बदलाचा परिणाम कांदा पिकावर झाला असला तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या काळजीमुळे उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नव्हता. शेतकऱ्यांनी कमी जागेत अधिकचे उत्पादन हे तंत्रच अवगत केले आहे. शिवाय कांदा पिकातून नुकसान अथवा फायदा असे म्हणूनही लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही वाढत आहे. बाजार समितीमधील व्यवहार आणि शेतकऱ्यांची जुडलेली नाळ यामुळे आवक वाढत आहे.
15 जानेवारीपासून दोन महिन्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे बाजार बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. असे असतानाही त्याचा दरावर परिणाम झालेला नव्हता. सध्या बाजारपेठेतील व्यवहार हे सुरु असून आवक ही वाढलेलीच आहे. पण बाजार समितीच्या निर्णयावर कांदा उत्पादक संघटने आक्षेप नोंदवला आहे. आता बाजारपेठ बंद ठेवली तर आंदोलन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते असा दावा संघटनेने केला आहे.
Latur Market: सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात, दर घटूनही शेतकऱ्यांवर ‘ही’ नामुष्की..!
फडातले वास्तव आयुक्तांसमोर : एफआरपी, ऊसाच्या प्रश्न बाजूलाच तोडणी अन् वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूटच