लातूर : कृषी बाजार समितीमध्ये सध्या आवक असलेल्या सोयाबीन, तूर आणि हरभरा या तिन्ही शेतीमालाच्या दरात काही प्रमाणात का होईना घट (Rate Fall) झालेली आहे. सध्या सोयाबीन आणि हरभरा या पिकाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून घटत्या दराचा (Agricultural commodities Arrival) आवकवर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. (Soybean Season) सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही 8 हजारांपर्यंत दर गेलेला नाही. शेतकऱ्यांना 10 हजारपर्यंत दर वाढतील अशी अपेक्षा होती पण बाजारपेठेत म्हणावा तसा उठावच झाला नाही. त्यामुळे 7 हजार 600 पेक्षा अधिकचा दर हा मिळालाच नाही. तर दुसरीकडे हरभरा दरातही घट होत आहे. 4 हजार 500 वरील हरभरा आता 4 हजार 400 वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने शेतीमालाची विक्री करण्याचा सल्ला व्यापारी तसेच प्रक्रिया उद्योजक अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.
हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरावरच आवक ही अवलंबून राहिलेली आहे. अधिकचे दर असले तर सर्वसाधारण आवक आणि कमी असले तरी आवकच होत नव्हती. घटलेल्या उत्पादनामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होणार हे शेतकऱ्यांना माहिती होते. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या भूमिकेवर अनेकवेळा दर हे बदलले आहेत. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात चित्र हे बदललेले आहे. 7 हजार 350 वर स्थिरावलेल्या सोयाबीनचा दर आता 7 हजार 220 रुपये प्रति क्विंटल असा आहे. असे असतानाही सोयाबीनची आवक ही सुरुच आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीन आणि संपूर्ण हंगामातील स्थिती पाहता साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री करण्यावरच शेतकऱ्यांचा भऱ आहे.
सोयाबीन पाठोपाठ लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि रब्बीतील हरभरा या पिकाची आवक होत आहे. शिवाय हमीभाव केंद्रावरही विक्री सुरु आहे. हरभऱ्यासाठी शासनाने 5 हजार 230 रुपये क्विंटल असा दर ठरविला आहे तर सध्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 440 रुपये असा दर आहे. क्विंटलमागे 800 रुपयांचा फरक असल्याने शेतकरी आता हमीभाव केंद्रच जवळ करु लागले आहेत. तुरीचीही हीच अवस्था असून हमीभावापेक्षा 150 रुपये कमी बाजारपेठेत दर आहेत. एकंदरीत शेतीमालाची आवक वाढली आणि मागणी कमी झाली आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आता पैशांची गरज भासते. शेती मशागत, बि-बियाणे यासाठी जमवाजमव केली जाते. यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनसह तूर आणि हरभऱ्याची आवक वाढली आहे. वाढत्या आवकमुळेच दरात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदम आवक न वाढविता टप्प्याटप्प्याने शेतीमालाची विक्री करणे गरजेचे आहे. साठवणूक करुन ठेवल्यास हरभरा आणि तुरीच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
Chickpea : मोहिम फत्ते, हरभरा पिकाने शासकीय गोदामेही फुल्ल, शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर
Cotton Crop : बाजार समितीचा पुढाकार अन् पीक पध्दतीमध्ये बदल, आटपाडीला मिळणार गतवैभव !