लासलगाव : (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या (PM kisan Scheme) पीएम किसान योजनेचा एक हप्ता जरी मिळाला नाहीतर शेतकरी यंत्रणेशी वाद घालून त्याच्या मागे कारण काय याची माहिती. असे असतानाही अनेकजण लाभार्थी असतानाही योजनेला मुकत आहे.नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिंचोडीच्या शेतकऱ्याची तर कहाणी काही औरच आहे. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी करण्यात आलेल्या अर्जावरच तो मृत असल्याचे दाखवण्यात आल्याने त्याला ह्या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. (Online Application) ऑनलाईन अपलोड करताना झालेली एक चूक चिचोंडीच्या त्रंबक बाबुराव निकम यांना चांगलीच सहन करावी लागली आहे. गेल्या 4 वर्षापासून निकम यांना ह्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता कारण समोर आले असले तरी शासकीय यंत्रणा मात्र, उडवाउडवीची उत्तरे देत आहे.
देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असला तरी चिचोंडीचे निकम हे अपवाद राहिले आहेत. त्यांनीही इतर शेतकऱ्यांप्रमाणे पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला म्हणून तलाठी कार्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज आणि तो ही 2018 साली केला होता. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन देखील त्यांना अद्यापपर्यंत एकही योजनेचा हप्ता मिळालेला नाही. प्रशासनातील एकाचा चुकीचा काय परिणाम होऊ शकतो यावरुन समोर आले आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्रंबक निकम यांनी महसूल विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केला होता. दरम्यान, त्याचवेळी त्रंबक निकम हे मृत असल्याचा उल्लेख अर्जावर झाला. त्यामुळे पीएम किसान योजनेचा एकाही हप्त्याचा लाभ त्यांना मिळालेला नाही. अखेर 11 हप्ता मध्यंतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर शहनिशा करण्यासाठी निकम यांनी ऑनलाईन केल्याची पावती जवळ ठेवली. त्यावरील उल्लेखावरुन त्यांना योजनेचा लाभ का मिळत नाही हे समोर आले. पावतीवरही ते मृत असल्याचाच उल्लेख होता. अखेर हा सर्व प्रकार समोर आला असून त्यांना हप्त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आता त्रंबक निकम यांनी योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार गावातील तलाठ्याकडे विचारणा केली असता हा शेतकरी जिवंत असून याचा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असून मंजुरी मिळाल्यावर त्या शेतकऱ्याचे पी एम किसान योजनेचा लाभ सुरू करण्यात येणार आहे. तहसीलदार प्रमोद हिले यांनी ही माहिती दिली असून 12 हप्ता तरी निकम यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.