Marathwada : शेतकऱ्यांच्या हितासाठी बॅंक अधिकाऱ्यांची सायकल वारी, नेमका काय उपक्रम?

| Updated on: Jul 28, 2022 | 12:16 PM

सध्या खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाची मोहिम सुरु आहे. याकरिता बॅंकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. असे असताना यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नेमक्या काय आहेत? त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो, योजनेचा लाभ घ्यायचा कसा ? अशी माहिती बॅंक अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत.

Marathwada : शेतकऱ्यांच्या हितासाठी बॅंक अधिकाऱ्यांची सायकल वारी, नेमका काय उपक्रम?
मराठवाड्यात सायकल रॅलीतून महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे अधिकीरी योजनांची जनजागृती करीत आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : शेतकऱ्यांसाठी (Bank Officer) बॅंक अधिकारी मैदानात हे जरा अवास्तव वाटतंय ना..! कारण शेतकऱ्यांच्या कामात अडथळा ठरणारे शेतकऱ्यांच्या मदतीला कसे? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण (Maharashtra Gamin Bank) महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने एक अभिनव उपक्रम राबवला असून त्याचा फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह महिला बचत गट आणि इतर योजनांसाठी पात्र असलेल्या संस्था अन् (Farmer) शेतकऱ्यांना होणार आहे. मराठवाड्यातील 31 गावांतून ही सायकल रॅली 550 किमी अंतर पार करुन योजनांची माहिती गावोगावात पोहचविणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतील 294 शाखेतील अधिकारी-कर्मचारी यांचा यामध्ये सहभाग असणार तर 12 दिवसांमध्ये योजनांबाबत जनजागृती केली जाणार आहे. गावोगावात बॅंक अधिकारी हे सायकलवरुन येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमका उद्देश काय ?

सध्या खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाची मोहिम सुरु आहे. याकरिता बॅंकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. असे असताना यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नेमक्या काय आहेत? त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो, योजनेचा लाभ घ्यायचा कसा ? अशी माहिती बॅंक अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे बॅंक अधिकारी आणि शेतकरी यांच्यामधील अंतर तर कमी होत आहे पण बॅंकेत कसे व्यवहार आणि योजनेच्या पात्रतेसाठी काय आवश्यक असते याची माहिती शेतकऱ्यांना होणार आहे. सलग 12 दिवस हा उपक्रम मराठावाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये राहणार असल्याचे नांदेड बॅंकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक आर.बी.कुरमुडा यांनी सांगितले आहे.

मोहिमेत काय असणार?

12 दिवसांच्या या सायकल प्रवासामध्ये बॅंक अधिकारी हे आर्थिक साक्षरता, वित्तीय समावेशन, सामाजिक सुरक्षा योजनेचा प्रसार, शंभर टक्के पीक कर्जाचे नुकनीकरण, नवीन पीककर्ज योजनेचा लाभ, महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. 20 जुलैपासून या रॅलीला सुरवात झाली असून आता ही नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचार आणि प्रसार सुरु आहे. या दरम्यानच्या काळात 550 किमी अंतर पार पाडले जाणार आहे. शिवाय शाखेतील अधिकारी कर्मचारी यांना देखील मार्गदर्शन राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांमधूनही स्वागत

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या या अनोख्या उपक्रमाचे शेतकऱ्यांकडूनही कौतुक केले जात आहे. बॅंकेत चकरा मारुनही कर्ज मिळत नाही पण बॅंक अधिकारी थेट गावात येत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मिटत आहेत. शाखेतील कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन मिळत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्यावर शाखेतच तोडगा निघणार आहे. जागोजागी बॅंक अधिकाऱ्यांची भेट शेतकऱ्यांसाठी येत असताना त्यांचे स्वागत केले जात आहे.