Excess Sugarcane : शेतकऱ्यांबरोबर साखर आयुक्तांचीही धावपळ, 90 लाख टन अतिरिक्त ऊस अन् दीड महिन्याचा कालावधी

| Updated on: Apr 10, 2022 | 2:49 PM

राज्यात आजच्या घडीला सरासरीपेक्षा अधिकच्या उसाचे गाळप झाले आहे. असे असूनही अजून तब्बल 90 लाख टन ऊस हा फडातच आहे. त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने आतापर्यंत एक ना अनेक पर्याय शोधले पण आता प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ज्या कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे त्या कारखान्याचे हार्वेस्टर आता ऊस शिल्लक असलेल्या जिल्ह्याकडे मार्गस्थ केले जात आहेत.

Excess Sugarcane : शेतकऱ्यांबरोबर साखर आयुक्तांचीही धावपळ, 90 लाख टन अतिरिक्त ऊस अन् दीड महिन्याचा कालावधी
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
Follow us on

लातूर : राज्यात आजच्या घडीला गतवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा अधिकच्या (Sugarcane Sludge) उसाचे गाळप झाले आहे. असे असूनही अजून तब्बल 90 लाख टन ऊस हा फडातच आहे. त्यामुळे (Sugar Commissioner) साखर आयुक्त कार्यालयाने आतापर्यंत एक ना अनेक पर्याय शोधले पण आता प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ज्या कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे त्या कारखान्याचे (Harvester) हार्वेस्टर आता ऊस शिल्लक असलेल्या जिल्ह्याकडे मार्गस्थ केले जात आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने शिल्लक उसाचा आढावा घेतला असून राज्यात 90 लाख ऊस गाळपाचा राहिलेला आहे. शिवाय दीड महिन्यामध्ये हे गाळप पूर्ण करण्याचे उद्दीष्ट हे साखर कारखान्यांसमोर राहणार आहे. त्याअनुशंगाने प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली आहे.

अपेक्षेपेक्षा उसाच्या क्षेत्रात वाढ

यंदाच्या गाळप हंगामात राज्यात 1 हजार 100 लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज होता. गतवर्षीपेक्षा अधिकचे उत्पादन होईल हे तर निश्चितच होते. पण आतापर्यंत 1 हजार 200 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर मराठवाड्यात अजूनही 90 लाख टन ऊसाचे गाळप होणे बाकी आहे. अपेक्षेपेक्षा अधिकच्या ऊसाची लागवड झाली. त्यामुळे गाळपाचे नियोजन हुकले. असे असले तरी साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिकच्या ऊसाचे गाळप करुनही हा प्रश्न कायम आहे. कधी नव्हे ते मराठवाड्यात अशी परस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मराठवाड्यात मार्गस्थ झाले आहेत.

दीड महिन्यात उद्दीष्ट साधण्याचा प्रयत्न

शिल्लक उसाचे गाळप करण्यासाठी अजूनही दीड महिन्याचा कालावधी हातामध्ये आहे. त्यानंतर मात्र, पावसाला सुरवात झाली तर हे शक्य होणार नाही. शिवाय कालावधी पूर्ण होऊन तर गेला आहेच पण 90 लाख टन ऊस दीड महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट साखर आयुक्तालयाने समोर ठेवलेले आहेय. ऊसतोड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे तर दुसरीकडे योग्य नियोजन करण्यात साखर आयुक्त हे दंग आहेत. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली लावणे हेच ध्येय असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

असे आहे अतिरिक्त उसाबाबतचे नियोजन

पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप पूर्ण झाल्यामुळे या भागातील हार्वेस्टर आता मराठवाड्यातील कारखान्यांना भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक येथील हार्वेस्टर सध्या बीड, जालना, लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाठवले जात आहेत. य़ाठिकाणी नेमलेले समन्वय अधिकारी हे उसतोडीचे नियोजन करणार आहेत. अखेर अतिरिक्त उसाचा आकडा समोर आला असून त्याअनुशंगाने काम सुरु झाले आहे. त्यामुळे आगामी काळात किती टन उसाचे गाळप होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Sangli : सांगलीवाडीच्या शिवारात बैलगाडा शर्यतीचा धुरळा, शर्यतीमध्ये ना काठी-ना लाठी

Gondia | गोंदियात Cycle Sunday Group ची अनोखी दिलदारी, पक्षांनाही मिळतेय थंडगार पाणी

Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार