लातूर: हंगामातील पिकांवर होणाऱ्या खर्चासाठी (Crop Loan) पीककर्जाचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. रब्बी आणि खरीप हंगामात (National Bank) राष्ट्रीयकृत बॅंकांना पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट हे दरवर्षा ठरवून दिले. यंदा (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीनसाठी हेक्टरी 53 हजार 900 तर उसासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत. शिवाय ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती खर्च भागविता येणार असून 12 महिन्यात परतफेड करणाऱ्यांसाठी सूट दिली जाणार आहे. खरीप हंगाम दोन महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. त्याअनुशंगाने कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
सध्या शेतकरी शेतीची मशागत करत आहे. पण, याच काळात शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज भासत असते. पीक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते. मात्र, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन उत्पादनात वाढ व्हावी हा यामागचा उद्देश आहे. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. त्यामुळे अधिकतर शेतकऱ्यांचा भर याच पिकावर असतो त्यामुळे यंदा हेक्टरी सोयाबीनसाठी 53 हजार 900 रुपये ठरवून देण्यात आले आहेत तर उसासारख्या नगदी पिकासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पीककर्जाचे वाटप हे सेवा सहकारी बॅंका तसेच राष्ट्रीयकृत बॅंकाकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळते. याकरिता त्या बॅंकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी त्या बॅंकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जही करु शकतात. शिवाय बॅंकांना काही गावे ही दत्तक दिली गेली आहेत. त्यानुसार त्या संबंधित गावांना कर्जपुरवठा करणे हे बॅंकेचे काम आहे.
पीककर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन, सर्व रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले इतर कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स आणि 3 फोटो हे आवश्यक आहे.
खरीपातील पेरणी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले तर त्याचा अधिकचा लाभ होणार आहे. त्यामुळे आतापासूनच ही प्रक्रिया सुरु झाली तर बॅंकांना त्यांचे उद्दीष्ट साधता येणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा योग्य वापर होणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हा प्रशासनाच्या बैठका पार पडत असून जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारी बैठकीत उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या सूचना बॅंक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Latur Market : शेतीमालाचे दर स्थिरावले, आता खरेदी केंद्रावर अधिकची आवक, कारण काय?
Farmer : कर्जमाफीची घोषणा, अंमलबजावणीबाबत देशातील चित्र काय? नाबार्डचा अहवाल
Special News : बीडच्या जाधव बंधूची ‘फिनिक्स भरारी’, आता थेट ‘कृषिभूषण’ पुरस्काराची मोहर