गोंदिया : कधी उत्पादनात घट कधी (Agricultural goods) शेतीमालाला कवडीमोल दर…यापैकी एकतरी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजलेले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये सरकारने (Farmer) शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. सध्या (Rabi Season) रब्बी हंगामात धान पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हेच मुख्य पीक आहे. त्यामुळे उत्पादन घटले असले तरी धान शेतीला हमीभावाचा आधार मिळाला तरच शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे. अन्यथा व्यापाऱ्यांचे अर्थार्जन कायम सुरुच राहणार आहे. मळणी केलेले धान्य दराअभावी कवडीमोल दरात विक्री करावे लाग आहे. शासनाने आता शेतकऱ्यांचा अंत ना पाहता त्वरित जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांना केली आहे.
धान शेतीची काढणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. असे असताना योग्य दर मिळाला असता तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता. पिकाची काढणी सुरु असतानच धान खरेदी केंद्र ही सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, ही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडेच शेतीमालाची विक्र करावी लागत आहेत. बाजारपेठ आणि हमीभाव केंद्रातील दरात मोठी तफावत आहे. शिवाय शेतकऱ्यांना आता खरिपाचे वेध लागले आहेत. त्यापूर्वीच धान्य खरेदी करावी लागणार आहे.
धान पिकाला हमीभाव ठरवून त्यानुसार विक्री झाली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. काढणी कामे अटोपूनही केवळ योग्य दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांची अडचण आणि केंद्र सरकारच्या उदासिनतेचा फायदा मात्र व्यपाऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाची साठवणूक आणि दर वाढले की विक्री हे व्यापाऱ्यांचे गणित ठरलेले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे अधिकच्या उत्पादनाचे गणित पुरते बिघडले आहे.
सध्या खरिपाची लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांना शेती मशागत, तसेच बी-बियाणे यासाठी पैशाची आवश्यकता आहे. असे असताना शेतीमालाची साठवणूक कऱणे हे शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे खरेदी केंद्राची वाट न पाहता शेतकरी थेट व्यापाऱ्यांनाच शेतीमालाची विक्री करीत आहेत. व्यापारी हाच माल साठवणूक करुन योग्य दर मिळताच विक्री करतात. शेतीमाल शेतकऱ्यांचा अन् फायदा व्यापऱ्यांचा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे केंद्राने त्वरीत धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे.