नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्राची योजना आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. २७ जुलै रोजी पीएम किसानचा १४ वा हप्ता मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या सीखर कार्यक्रमात १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. यावेळी ते राजस्थानच्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील. साडेआठ कोटींपेक्षा जास्त शेतकरी पीएम किसान योजनेचा फायदा घेतील. प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळतील.
आतापर्यंत केंद्र सरकारने १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये जमा केले जातात. दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
स्टेट्स माहिती करून घेण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे. होमपेजवर फार्मर्स कॉर्नरचा सेक्शन दिला आहे. त्यावर क्लीक करावे. त्यानंतर लाभार्थी स्थिती टॅबवर क्लीक करावे. आधार क्रमांक किंवा बँक खाता क्रमांक टाकावा लागेल. गेट डाटा क्लीक करता क्षणी तुमची पूर्ण माहिती समोर येईल.
सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे. न्यू फार्मर्स रजीस्ट्रेशनवर क्लीक करावे. आधार नंबर टाकून कॅप्चा भरावा. पूर्ण डिटेल्स भरावे. एस वर क्लीक करावे. मागीतलेली सर्व माहिती सेव्ह करावी. प्रिंट आऊटही काढून ठेवू शकता.
केंद्र सरकार वर्षाचे सहा हजार रुपये देते. राज्य सरकारही सहा हजार रुपये देणार आहे. अशी घोषणा करण्यात आली. पण, राज्य सरकारची मदत केव्हापासून मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. शेतकरी राज्य सरकारची मदत केव्हापासून मिळेच याची वाट पाहत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत १२ हजार रुपये मिळणार आहेत.