यवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई

| Updated on: Jun 17, 2021 | 6:04 PM

मान्सून पावसामुळे (Monsoon 2021) जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. आता मोठ्या प्रमाणात परवानगी नसलेल बियाणं बाजारात येत आहे.

यवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई
यवतमाळमध्ये बीटी बियाणं जप्त
Follow us on

यवतमाळ : मान्सून पावसामुळे (Monsoon 2021) जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. आता मोठ्या प्रमाणात परवानगी नसलेल बियाणं बाजारात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील देवगाव येथून कळंब तालुक्यातील वटबोरी येथे जात असलेले 25 लाखांचे ‘बीटी’ बियाण्याची पाकीट कृषी विभागाने जप्त केली आहेत. ही कारवाई यवतमाळ-कळंब मार्गावर करण्यात आली. एका चारचाकी वाहनातून ही तस्करी होत होती. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. (Yavatmal Police and Agriculture dept. seized htbt seeds of twenty five lakh)

कृषी विभागाकडून साठा जप्त

शेतकर्‍यांना आवश्यक असलेले बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचले आहे. असे असले तरी परवानगी नसलेले बियाणेही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. अमरावती वरुन ‘बीटी’ची मोठी खेप येत होती. कृषी विभागाने हा साठा जप्त केला. यासंदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर , कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर , , जिल्हा कृषी अधिकारी सामान्य निलेश ढाकुलकर, राजेंद्र माळोदे, पंकज बरडे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दतात्रय आवारे यांनी केली.

75 ते 100 मिमी पावसाशिवाय पेरणी करु नका

गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आला. निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते. . सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. . शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या:

बार्शीच्या शेतकऱ्याची दुष्काळावर मात, खजूर शेतीतून लाखोंची कमाई, राजेंद्र देशमुख यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा

Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा

मिरची शेती शेतकऱ्यांना यंदाही चांगले पैसे मिळवून देणार, मागणी वाढल्यानं बियाणं महागलं

(Yavatmal Police and Agriculture dept. seized htbt seeds of twenty five lakh)