मुंबई : नवीन 2021 बीएमडब्ल्यू 6 सीरीज जीटी (2021 BMW 6 Series GT) भारतात लॉन्च करण्यात आली आहे. ही शानदार कार 67.90 लाख ते 77.90 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच केली आहे. कंपनीने ही कार तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केली आहे, यामध्ये 630i M स्पोर्ट, 620d लक्झरी लाइन आणि 630d M स्पोर्ट या कार्सचा समावेश आहे. नवीन 6 सिरीज Gran टूर फेसलिफ्टने गेल्या वर्षी जागतिक स्तरावर पदार्पण केलं होतं. नवीन 6 जीटी थोडी लांब आहे, त्यामुळे या कारमध्ये तुम्हाला अधिक स्पेस आणि कम्फर्ट मिळेल. (2021 BMW 6 Series GT facelift launched in India, price and features will surprise you)
अंडर द हुड BMW 6 सिरीज Gran Tourismo तीन इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. यामध्ये दोन डिझेल आणि एका पेट्रोल इंजिनाचा समावेश आहे. यामध्ये तुम्हाला 2.0 लीटर डिझेल, 3.0 लीटर डिझेल आणि 2.0 लीटर पेट्रोल व्हेरिएंट मिळेल. जे 5000 rpm वर 255 bhp पॉवर आणि 400Nm का टॉर्क जनरेट करतं. कंपनीचे या कारबाबत असा दावा केला आहे की, ही कार 6.5 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग घेऊ शकते. या कारचं टॉप स्पीड 250 किमी प्रतितास इतकं आहे. या कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे.
ही कार लक्झरी लाइन आणि एम स्पोर्टसह दोन डिझाइन ट्रिममध्ये येते. यात आपणास किडनी ग्रिल अपफ्रंट, रीस्टाइल्ड हेडलाइट्स आणि रिव्हाइज्ड बंपर्स मिळतात. रियर सेक्शनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, मात्र नवीन अलॉय व्हील्स दिले आहेत. या कारमध्ये दोन मोठे पॅनारोमिक सनरुफ देण्यात आले आहेत.
या कारच्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये एक नवीन 12.3-इंचाची टचस्क्रीन मिळेल. ही स्क्रीन अॅपल कारप्ले आणि अँड्रॉयड ऑटो कनेक्टिव्हिटीसह मिळेल. या कारच्या इतर काही स्टँडर्ड फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एम्बियंट लाइटिंग, 360 डिग्री कॅमेरा, 4 झोन क्लायमेट कंट्रोल आणि इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल रीअर सीटसह बीएमडब्ल्यू लेसर लाईट मिळते. या व्यतिरिक्त, आपल्याला रियल स्पॉयलर, एअर सस्पेंशन, वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स आणि इतर फीचर्स मिळतात.
भारतात बीएमडब्ल्यू ऑल-न्यू BMW M340i या सेडान कारची किंमत 62.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. कंपनी या वाहनाच्या केवळ मर्यादित युनिट्सची विक्री करीत आहे, या कारचे उत्पादन स्थानिक स्तरावर केले जात आहे. ग्राहक 1 लाख रुपये देऊन या लक्झरी कारची बुकिंग करू शकतात. कार बुक करणाऱ्या पहिल्या 40 ग्राहकांना भारतातील लोकप्रिय रेसट्रॅकमध्ये क्यूरेट ड्रायव्हर ट्रेनिंग (क्युरेट चालक प्रशिक्षण) दिले जाईल आणि त्याचे प्रमाणपत्रदेखील दिलं जाईल.
BMW M340i एक ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअपसह येणारी सर्वात वेगवान कार आहे. ही कार 3.0 लीटर, 6 सिलेंडर इंजिनासह सादर करण्यात आली आहे. या कारचे इंजिन 387 बीएचपी पॉवर आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार अवघ्या 4.4 सेकंदात 100 किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक गती धारण करण्यास सक्षम (स्पीड घेते) आहे. त्यामुळे ही कार तिच्या सेगमेंटमधील उर्वरित कारपेक्षा खूपच वेगवान कार आहे, असे म्हणता येईल. या कारच्या इंजिनला पॅडल शिफ्टर्ससह 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा आहे. बीएमडब्ल्यू M340i ला इलेक्ट्रिकली मॅनेज करण्यासाठी नवीन लिफ्ट-रिलेटेड डम्पर कंट्रोल देण्यात आला आहे.
इतर बातम्या
2021 Jaguar F-Pace Facelift साठी भारतात बुकिंग सुरु, लवकरच लाँच होणार
ही जबरदस्त कार 8 लाख रुपये सवलतीत उपलब्ध, कार विकत घेण्याची चांगली संधी
सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणार, Hummer EV च्या लूकची चाहत्यांना भुरळ
(2021 BMW 6 Series GT facelift launched in India, price and features will surprise you)