शानदार 2021 Jawa 42 बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

| Updated on: Feb 16, 2021 | 7:03 PM

Classic Legends Private Limited कंपनीने नुकतीच अपडेटेड 2021 जावा 42 लाँच केली आहे.

शानदार 2021 Jawa 42 बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत
Follow us on

मुंबई : Classic Legends Private Limited कंपनीने नुकतीच अपडेटेड 2021 जावा 42 बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत 1,83,942 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. नवीन जावा फोर्टी-टू (Jawa 42) मध्ये तीन नवीन रंग मिळतील. या बाईकममध्ये काळ्या रंगाच्या 13-स्पोक अलॉय व्हील्ससह ट्युबलेस टायर्स आणि अन्य काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जावा 42 आता तीन नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ओरियन रेड, सीरियस व्हाईट आणि ऑलस्टार ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. (2021 Jawa 42 launched at 1.84 lakh rupees, Gets updated styling, new colour options)

Classic Legends चे सीईओ आशिष सिंह या बाईकच्या लाँचिंगवेळी म्हणाले की, मागील वर्षी आम्ही बीएस 6 सह वाहनं घेऊन बाजारात आलो. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. उलट आम्ही आमच्या मोटारसायकलींची कार्यक्षमता सुधारण्यावर भर दिला. आम्ही एक्झॉस्ट नोट थ्रेशर अधिक आकर्षक बनवलं आहे. या बाईकची सीट थोडी वाढवली आहे आणि पंचसाठी क्रॉस-पोर्ट इंजिन निश्चित केलं आहे. आम्ही ‘क्लासिक स्पोर्ट्स’ स्ट्राइप्स, अलॉय व्हील्स आणि ट्युबलेस टायर्ससह स्टँडर्ड फिटमेंट तसेच फ्लाय-स्क्रीन, हेडलैंप ग्रिलमध्ये एक्सेसरीजमध्ये अपडेट्स केले आहेत.

फीचर्स

कंपनीने या बाईकच्या सीट पॅनला पुन्हा एकदा रिडिझाईन केलं आहे. अधिक आराम आणि अधिक रूम प्रदान करण्यासाठी सीट कुशनिंग केलं आहे. सस्पेंशन सेट-अपला पुन्हा एकदा अपडेट केलं आहे. जेणेकरुन अवघड रस्त्यांवर किंवा खराब रस्त्यांवरही या बाईकवरुन अधिक आरामदायक प्रवास करता येईल. तसेच ही बाईक अधिक आकर्षक बनवण्यावर कंपनीने भर दिला आहे. बाईकच्या हँडलिंगमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

अनेक बदलांमुळे ही बाईक अधिक दमदार बनली आहे. या बाईकमधील 293 सीसी, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड, फ्युल-इंजेक्टेड इंजिन 27 बीएचपी पॉवर जनरेट करु शकतं. तसेच 6,800 आरपीएमवर 27.03 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. 2021 च्या जावा फोर्टी-टू या बाईकचं वजन 172 किलोग्रॅम इतकं आहे. यामध्ये अॅर्गोनॉमिक्स आणि कॉर्नरिंग क्लियरन्स सुधारण्यावर कंपनीने भर दिला आहे. ही बाईक आता जावा डीलरशीपकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा

TVS कडून शेजारील देशात Ntorq 125 SuperSquad मार्वल एडिशन स्कूटर लाँच; जाणून घ्या खासियत

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

Honda ची नवी स्क्रॅम्बलर CB350 RS लाँच, बाईक स्मार्टफोनसोबत कनेक्ट करता येणार

(2021 Jawa 42 launched at 1.84 lakh rupees, Gets updated styling, new colour options)