वॉशिंग्टन डी. सी. : लँड रोव्हरने नवीन डिफेंडर व्ही 8 (2021 Land Rover Defender V8) जागतिक स्तरावर लाँच केली आहे. ही कार Navrik Black रूफसह ग्रे पेंट शेडमध्ये सादर करण्यात आली आहे. या मॉडेल्समध्ये सॅटिन ब्लॅक हेडलाइट्स आणि क्सीनन ब्लू ब्रेक कॅलिपरदेखील आहेत जे वाहनास स्पोर्टी लुक देतात. नवीन लँड रोव्हर डिफेंडर व्ही 8 मध्ये 5.0-लीटर, व्ही 8 मोटर आहे जी 511 बीएचपी आणि 625 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही कार ताशी 240 कि.मी. वेगाने धावू शकते, तसेच 5.6 सेकंदात ही कार तीन अंकी (ट्रिपल डिजीट) वेग घेऊ शकते. (2021 Land Rover Defender V8 Launched in US know price and features)
भारतात लाँच केलेले शेवटचे डिफेन्डर मॉडेल PHEV P400e होते जे 2.0 लिटर, फोर सिलेंडर, बीएस 6 पेट्रोल इंजिनवर चालते, हे इंजिन 383 बीएचपी आणि 640 एनएम टॉर्कचे हायब्रिड पॉवरट्रेन तयार करते. पॉवरट्रेन टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रांसमिशनशी जोडले जाते, जे लँड रोव्हरच्या लेटेस्ट टेरेन रिस्पॉन्स फॉर व्हील ड्राइव्ह (4WD) प्रणालीद्वारे सर्व चार चाकांना शक्ती देते. PHEV लँड रोव्हर डिफेन्डर 5.6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.
नवीन डिफेंडर V8 मॉडेलमध्ये आतील बाजूस ऑल-ब्लॅक फिनिशिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे त्याचा लूक जबरदस्त आहे. तर इतर सर्व फीचर्स काही स्टँडर्ड मॉडेलशी सुसंगत आहेत.
लँड रोव्हरने एलईडी बॉक्स आणि बॉक्सी सिल्हूट टिकवून ठेवणाऱ्या टेललाईट्समध्ये अॅल्युमिनियमच्या कास्टिंगसह अनेक फीचर्स जोडले आहेत.
टेरेन रिस्पॉन्स 2 सिस्टम अॅडजस्ट करण्यासाठी कॉन्फिगर केली जाऊ शकते आणि ऑफ-रोडवर जात असताना स्वयंचलितपणे 145 मिमी पर्यंत वाढते.
या कारचा न्यूमेटिक सस्पेन्शन ग्राउंड क्लियरन्स कमी करता येतो, जेणेककरुन इंप्रेशन और इगोरमेंटमध्ये सुधार होईल, या SUV ममध्ये जास्तीत जास्त 900 मिमी डेप्थ मिळते
नवीन लँड रोव्हर डिफेंडर V8 च्या बेस ट्रिमची अमेरिकेत सुमारे 108,000 डॉलर्स इतकी किंमत ठेवली आहे. ज्याची किंमत भारतातील सुमारे 78 लाख रुपये इतकी आहे.
सध्या लँड रोव्हर डिफेंडरचे S, SE, HSE आणि फर्स्ट एडिशन ट्रिम विक्रीसाठी उपलब्ध आहे. डिफेंडर 90 आणि डिझेल इंजिन लवकरच भारतात दाखल होऊ शकते. युरो NCAP ने सांगितले की, सुरक्षिततेसंबंधित चाचणी 2020 मध्ये विकल्या गेलेल्या सर्व डिफेन्डर्सना लागू आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही ग्राहकांसाठी ही चांगली बातमी आहे. यामध्ये तुम्हाला सीट बेल्ट प्रीटेन्शनर्स, लोड लिमिटर्स, ISOFIX टीथर आणि एअरबॅग कट ऑफ स्विच देण्यात आले आहेत. वाहनात आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टम, रियर कॉलिसन मिरर आणि लेन कीप असिस्ट असे फीचर्स दिले आहेत. जेव्हा कार अचानक कोणत्याही गोष्टीवर आदळते तेव्हा ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम काम करते.
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर
Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी
(2021 Land Rover Defender V8 Launched in US know price and features)