मुंबई : महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra And Mahindra) कंपनीची 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ फेसलिफ्ट (Mahindra Scorpio Facelift) SUV चं भारतीय रस्त्यांवरील कव्हरसह टेस्टिंग सुरु आहे. 2022 स्कॉर्पिओचं एक्सटीरियर याआधी अनेकदा लीक्ड फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. मात्र आता कारचं एक्सटीरियर पाहायला मिळालं आहे. पहिल्यांदाच या फेसलिफ्टेड एसयूव्हीच्या आतील भागाची झलक स्पष्टपणे समोर आली आहे. नवीन स्कॉर्पिओ काय ऑफर करेल याची माहिती घेण्यासाठी 2022 स्कॉर्पिओचे टेस्टिंग युनिट एका व्लॉगरने पाहिले. या थ्री-रो एसयूव्ही (SUV) मध्ये केवळ पुढच्या बाजूला सीट्स असतील. टेस्टिंग मॉडेल्समधील सीट्स चामड्याने बांधलेल्या आहेत. दुसऱ्या रांगेतील प्रवाशांना समोरच्या प्रवाशांसाठी आर्मरेस्टच्या मागे एसी व्हेंट्स असतील.
2022 Scorpio SUV च्या डॅशबोर्डमध्ये एक मोठे इन्फोटेनमेंट युनिट असेल, जे टचस्क्रीन युनिट असण्याची शक्यता आहे. इन्फोटेनमेंट युनिटच्या पुढील बाजूस वर्टीकल ओरिएंटेड एसी व्हेंट्स आहेत. क्लायमेट कंट्रोल आणि इतर गोष्टींसाठी सेंटर कन्सोलवर फिजिकल बटणे असतील. ड्रायव्हर डिस्प्ले देखील एक डिजिटल युनिट असेल तर विविध कंट्रोल्स स्टीयरिंग व्हीलवर माउंट केले जातील.
Mahindra पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांसह 2022 Scorpio SUV ऑफर करण्याची शक्यता आहे. 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन, जे थार एसयूव्हीला देखील पॉवर देते, ते स्कॉर्पिओसाठी देखील वापरले जाण्याची शक्यता आहे. इंजिन 130 Bhp मॅक्सिमम पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येण्याची अपेक्षा आहे. डिझेल युनिट्ससाठी, महिंद्रा नवीन स्कॉर्पिओमध्ये 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन वापरण्याची शक्यता आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, इंजिन 138 Bhp मॅक्सिमम आउटपुट आणि 320 Nm चे पीक टॉर्क जनरेट करू शकते.
इतर बातम्या
आता इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरी रिसायकल होणार, Ford आणि Volvo ने सुरु केली स्टार्टअप कंपनी
BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?