Yamaha-YZF-R3
Image Credit source: Yamaha Motor India
मुंबई : जपानची वाहन निर्माता कंपनी यामाहा मोटरने (Yamaha Motor) अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय मोटरसायकल 2022 वायझेडएफ आर3 (2022 YZF-R3) चं रिव्हाईज्ड व्हर्जन सादर केलं आहे. जे नुकतेच तैवानमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. आगामी काळात ते इतर देशांमध्येही लाँच केले जाऊ शकते. मात्र, ही नवीन मोटरसायकल भारतात कधी दाखल होईल, याबाबत कसलीही माहिती समोर आलेली नाही. अपडेटेड 2022 YZF R3 मोटारसायकलवर नवीन कलर स्कीमसह शानदार डिझाइन देण्यात आलं आहे. ही बाइक आता विविड ऑरेंज (Vivid Orange) पेंट स्कीममध्ये सादर करण्यात आली आहे. यापूर्वी रेसिंग ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक अशा रंगांमध्ये मोटरसायकल विकली जात होती. दरम्यान, यामाहा मोटर इंडियाने अलीकडेच तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि इरोड येथे त्यांचे दुसरे ‘ब्लू स्क्वायर’ आउटलेट उघडण्याची घोषणा केली.
- 2022 YZF-R3 ची किंमत: तैवानमध्ये, 2022 Yamaha YZF-R3 ची किंमत TWD 2,70,000 (जवळपास 7.2 लाख रुपये) इतकी आहे. प्रीमियम टू-व्हीलर या वर्षाच्या अखेरीस भारतात लॉन्च होऊ शकते.
- 2022 YZF-R3 चे डिझाईन : नव्याने सादर करण्यात आलेला विविड ऑरेंज पेंट थीम फ्यूल टँक, फ्रंट फेंडर आणि फेअरिंगच्या वरच्या भागावर थीमसह डिझाइन केली गेली आहे. यासोबतच स्पोर्टी दिसणारी ड्युअल टोन फिनिश सादर करण्यात आली आहे. मोटरसायकलच्या उर्वरित डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- 2022 Yamaha YZF-R3 चे स्पेसिफिकेशन्स : बाईकला मस्क्यूलर फ्युएल टँक, स्प्लिट-स्टाईल सीट्स, एक अपस्वेप्ट एक्झॉस्ट, एक पारदर्शक विंडस्क्रीन, सोनेरी रंगाचे फ्रंट फोर्क्स, व्हेंट्स आणि बाणाच्या आकाराचे आरसे आहेत. बाईक प्रकाशासाठी ऑल-एलईडी सेटअप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि डिझायनर ब्लॅक-आउट व्हीलसह येते. बाईकच्या इतर फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये एलईडी लायटिंग, एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एबीएस तंत्रज्ञान समाविष्ट आहे.
- 2022 Yamaha YZF-R3 चं इंजिन : मोटरसायकल त्याच 321cc, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिनसह सुसज्ज आहे जे 10,750rpm वर 40.4bhp आणि 9,000rpm वर 29.4Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन आणि स्लिप्ड क्लचशी जोडलेले आहे. बाईकवरील सस्पेन्शन किटमध्ये अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स, रियर मोनोशॉकचा समावेश आहे.
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 220 KM रेंज, Komaki DT3000 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच
सर्वात मोठी चाकं असलेली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही