मुंबई, मारुती सुझुकी (Maruti Suzuki Car Offer) जानेवारीपासून आपल्या कारच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. दरवाढीपूर्वी डिसेंबर महिन्यात कंपनी आपल्या काही निवडक मॉडेलवर सूट देत आहे. मारुती सुझुकी डिसेंबरमध्ये काही मॉडेल्सवर 50,000 रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे. ऑफरमध्ये कॉर्पोरेट सवलत, विनिमय लाभ आणि रोख सवलत समाविष्ट आहे. तुम्हालाही मारुती सुझुकी कार खरेदी करायची असेल, तर ऑफरच्या संपूर्ण तपशीलासाठी तुम्हाला जवळच्या डीलर किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जाणून घेऊया कोणकोणत्या मॉडेलवर कंपनी सूट देत आहे.
मारुती सुझुकी आपल्या सर्वात लहान कारवर सर्वात मोठी सूट देत आहे. नवीन पिढीच्या Alto K10 वर डिसेंबरमध्ये 52,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यासारख्या फायद्यांचा समावेश आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 22,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तर CNG व्हेरिएंटवर 45,100 रुपयांची सूट मिळत आहे.
मारुती सेलेरियो ही दुसरी कार आहे ज्यावर सर्वाधिक सूट दिली जात आहे. या कारवर एकूण ₹ 46,000 ची सूट उपलब्ध आहे. CNG व्हेरियंटवर 45,100 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, Alto K10 CNG प्रमाणेच, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची विक्री 21,000 रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.
व्हॅगनार आणि अल्टो 800 वर 42,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या महिन्यात, स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर सब-कॉम्पॅक्ट सेडानवर 32,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. शुक्रवारी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमती जानेवारीपासून वाढवणार असल्याची घोषणा केली होती. वाढलेल्या निर्मिती खर्चामुळे हे करावे लागल्याचे बोलले जात आहे.