नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : देशातील या घडीची सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयुव्ही टाटा नेक्सॉन ईव्हीला 5 महिन्यांपूर्वीच अपडेट करण्यात आली आहे. ग्राहकांच्या या कारवर उड्या पडल्या आहेत. इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ही कार किफायतशीर ठरली आहे. या कारमध्ये जोरदार रेंजसह फीचर्सची पण रेलचेल आहे. टाटा नेक्सॉनची ईव्ही, क्रिएटिव्ह, फिअरलेस, एम्पावर्डसह एकूण 9 व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे. नवीन नेक्सॉन ईव्ही रेड, व्हाईट, टील, ऑक्साईड, पर्पल, ओशियन, ग्रे सारख्या 7 आकर्षक रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे. या कारच्या किंमतीविषयी अनेकांना उत्सुकता आहे. विविध मॉडेल्सच्या वेगवेगळ्या किंमती आहेत. या कारसाठी काही दिवसांचे वेटिंग आहे.
काय आहे किंमत
बॅटरी पॉवर, रेंज आणि वेग
टाटा नेक्सॉन ईव्हीमध्ये 30kWh पासून ते 40.5 kWh पर्यंत लिथियम आयन बॅटरी आहे. इलेक्ट्रिक मोटर 142.68 बीएचपीपर्यंत पॉवर जनरेट करते. ही 5 सीटर कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयुव्ही एकदा फुल चार्ज केल्यावर 325 किलोमीटर ते 465 किलोमीटर पर्यंत रेंज देतात. ही ईव्ही 7.2 kW एसी चार्जरच्या माध्यमातून 4 तास 20 मिनिटांपासून ते 6 तासांपर्यंत फुल चार्ज होते. तर डीसी फास्ट चार्जिंगच्या माध्यमातून अधिक लवकर चार्ज होते. टाटा नेक्सॉन ईव्हीचा सर्वाधिक वेग 150 kmph पर्यंत आहे.