Baleno, Swift राहिल्या मागे, या गाडीला सर्वाधिक लोकांनी खरेदी केलं, कारमध्ये काय स्पेशल जाणून घ्या…

| Updated on: Aug 08, 2022 | 12:48 PM

मारुती वॅगनआर या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे. याशिवाय जुलै महिन्यातही विक्रीच्या बाबतीत ते अव्वल स्थानावर आहे. या मागचं नेमकं काय कारण, वाचा...

Baleno, Swift राहिल्या मागे, या गाडीला सर्वाधिक लोकांनी खरेदी केलं, कारमध्ये काय स्पेशल जाणून घ्या...
कार
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : कार घ्यायची असल्यास आपण वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या कार बघतो, त्याचे फीचर्स आणि किंमतही (Price) जाणून घेतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका लोकांच्या पसंतीच्या कारची माहिती सांगणार आहोत. मारुती वॅगनआर (Maruti Wagon R) ही या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सर्वाधिक विक्री होणारी कार (Car) आहे. याशिवाय जुलै महिन्यातही विक्रीच्या बाबतीत ही अव्वल स्थानावर आहे. गेल्या महिन्यात या कारसाठी एकूण 22 हजार 588 वाहनांची विक्री झाली आहे. मारुती वॅगनआर हॅचबॅक भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून समोर आली आहे. 1 लाख 13 हजार 407 युनिट्सची विक्री झाली आहे. ही गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 19.58 टक्क्यांनी वाढली आहे. या कारविषयी आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. जाणून घ्या…

किंमत किती?

मारुतीची WagonR हॅचबॅक 1.0L आणि 1.2L किंपेट्रोल इंजिनसह येते. WagonR किंमत 5.47 लाख ते  7.20 लाख (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान आहे.हे CNG (1.0L) मध्ये 34.05kmpl आणि पेट्रोल AGS (1.0L) मध्ये 25.19kmpl मायलेज देते.

फीचर्स जाणून घ्या?

नवीन WagonR मध्ये हिल होल्ड असिस्ट (स्टँडर्ड), ड्युअल एअरबॅग्ज (स्टँडर्ड), रियर पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, स्पीड अलर्ट सिस्टम, सुरक्षा अलार्म, फ्रंट फॉग लॅम्प, बजरसह सीट बेल्ट रिमाइंडर, सीट बेल्ट प्री आहे. टेंशनर आणि फोर्स लिमिटर, स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक आणि चाइल्ड प्रूफ रिअर डोअर लॉक यासह 12 हून अधिक सुरक्षा फीचर्स आहेत.

हायलाईट्स

  1. मारुतीची WagonR हॅचबॅक 1.0L आणि 1.2L किंपेट्रोल इंजिनसह येते.
  2. WagonR किंमत 5.47 लाख ते  7.20 लाख (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
  3. CNG (1.0L) मध्ये 34.05kmpl आणि पेट्रोल AGS (1.0L) मध्ये 25.19kmpl मायलेज देते.

सीएनजीला मागणी जास्त

मारुती वॅगनआर एस-सीएनजीमध्ये 1.0-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे CNG मोडमध्ये 58 bhp पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल मोडमध्ये असताना हे इंजिन 81 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. S-CNG प्रकार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेला आहे. मारुती वॅगनआर एस-सीएनजी ड्युअल इंटरडिपेंडेंट ईसीयू (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स) आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमने सुसज्ज आहे. कंपनीने हे फॅक्टरी फिटेड किट अशा प्रकारे बसवले आहे की त्याचा कारच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही.

आता कार घ्यायची असल्यास तुम्हाला मारुती वॅगनआरची माहिती मिळाली आहे. तुमच्याकडे आणखी एक पर्याय उपलब्ध झालाय.