बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे कोट्यवधी चाहते आहेत. फक्त फिल्म स्टार्स नव्हे तर बिझनेसमन पासून ते अनेक राजकारण्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्याशी त्यांचं खास नातं होतं, त्याबद्दल बिग बऱ्याचदा बोलले आहेत. पण दिवंगत उद्योगपती रतन टाटा आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या टाटा नॅनोशी देखील त्यांचं खास नातं होतं हे तुम्हाला माहीत आहे का ?
लोकांना परवडणाऱ्या किमतीत सुरक्षित कार उपलब्ध करून देणे हा रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. म्हणून त्यांनी 2008 मध्ये टाटा नॅनो लाँच केली. त्यांना ही कार इतकी आवडली की त्यांच्या निवृत्तीच्या दिवसांमध्ये ते अनेकदा या कारमधून प्रवास करत होते. ही कार त्यांनी अवघ्या 1 लाख रुपयांत लाँच केली होती.
जेव्हा अमिताभ यांनी विकत घेतली नॅनो
रतन टाटा यांच्या कारला मोठा प्रतिसाद मिळाल. फक्त सामान्य लोक नव्हे तर अमिताभ बच्चन हे देखील या कारचे फॅन होते. अमिताभ यांच्या कलेक्शनमध्ये एकाहून एक सरस कार आहेत. तरूण वयापासूनच त्यांना गाड्यांचा शौक होता. पण 2015 मध्ये जेव्हा Tata Nanoचं अपग्रेड व्हर्जन लाँच झालं, तेव्हा अमिताभ यांना रवालं नाही, त्यांनी लगेच ती कार खरेदी केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन बंगालमध्ये होते तेव्हा त्यांना टाटा नॅनोच्या अपग्रेडेड व्हर्जनबद्दल माहिती मिळाली. त्यांनी कोलकाता येथील एका शोरूममध्ये जाऊन ही कार चेक केली आणि एकाच वेळी 2 कारची ऑर्डर दिली. त्यांनी लाल आणि जांभळ्या रंगाची नॅनो खरेदी केली होती. त्यांनी त्यांची नात नव्या नवेली हिच्यासाठी कार खरेदी केली होती. मात्र आता त्यांच्या कलेक्शनमध्ये ही कार आहे की नाही याची माहिती सध्या उपलब्ध नाही.
दोघांचही कुत्र्यांवर प्रेम
अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांच्यात आणखी एक कनेक्शन आहे. दोघांचंही कुत्र्यांवर खूप प्रेम . अमिताभ बच्चन यांच्याही घरात सुरुवातीपासून कुत्रे आहेत, तर रतन टाटा यांनी टाटा सन्सच्या त्यांच्या कार्यालयाचा काही भाग कुत्र्यांसाठी क्रेशमध्ये बदलला होता. रतन टाटा यांनीही त्यांच्या मृत्यूपत्रात कुत्र्यासाठी बरीच तजवीज केली आहे.
खास होती Tata Nano
एका सामान्य भारतीय कुटुंबाला पावसात भिजताना पाहिल्यावर रतन टाटा यांना नॅनो कार बनवण्याची कल्पना सुचली. 2 मोठी माणसं आणि दोन लहान मुलं असलेलं ते कुटुंब स्कूटरवरून जात होतं आणि पावसातून जाताान त्यांची स्कूटर घसरण्याचा धोका होता. मग रतन टाटा यांच्या डोक्यात अशी कार बनवण्याची आयडिया सुचली. जी स्कूटर किंवा बाईकच्या किमतीत येईल आणि त्यातून सुरक्षित प्रवास करता येईल.