नवी दिल्ली – महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) अनेकदा ट्विटरवर व्हिडीओ (Twitter Video) शेअर करतात. तसेच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेकदा लोकांच्यामध्ये चर्चा सुरू होते. त्यांचा एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर आला की, लोकांना पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते. काही क्षणात तो व्हिडीओ व्हायरल होतो. शुक्रवारी एक जीप (Jeep) पलटी झालेला व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत असलेली जीप तीनवेळा पलटी झाल्यानंतर थेट धावू लागली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना कमेंटमधून प्रश्न विचारले आहेत.
“Dictionary Definition of the phrase ‘on a roll:’ To have great success which seems likely to continue.”
This clip’s apparently from a rally in a plantation in the South. Naturally I’m delighted with the ruggedness of the car but I wouldn’t recommend anyone try to replicate this! pic.twitter.com/geeIJhXQAy हे सुद्धा वाचा— anand mahindra (@anandmahindra) May 13, 2022
जीपची ताकद प्रचंड आहे
आनंद महिंद्रा यांनीही या व्हिडिओसोबत एक उत्तम पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की शब्दकोशातील ‘ऑन अ रोल’ची व्याख्या चांगली प्रगती करणे असा आहे. तसेच ती प्रगती टिकली पाहिजे. व्हिडीओतील कार पाहून मला तसंच वाटतंय. हा व्हिडिओ बहुतेक दक्षिण भारतातील रॅली दरम्यानचा आहे. जीपची ताकद पाहून मला नक्कीच आश्चर्य वाटले आहे. परंतु मी कोणालाही तशा पध्दतीचं कृत्य करा असं म्हणणार नाही. संबंधित ट्विटमधील व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
— Muthappa (@muramaletira) May 13, 2022
त्या व्हिडीओत काय आहे
या व्हिडिओमध्ये जी जीप दिसत आहे, ती महिंद्राच्या मेजरसारखीच सेम टू सेम दिसत आहे. महिंद्रा मेजर ही कंपनीच्या विलीस जीपची कॉपी होती. महिंद्राने 1949 मध्ये विलीस जीपची विक्री सुरू केली.
त्या गाडीला आज नवी टेक्नॉलॉजी देऊन महिंद्रा थार बनवली आहे.