मुंबई : जर्मनीची लक्झरी कार बनवणारी कंपनी ऑडी (Audi) आपल्या कारचे दर वाढवणार आहे. ऑडी इंडिया (Audi India) 1 एप्रिलपासून आपल्या एसयूव्ही कारच्या किंमतीत 3 टक्के वाढ करणार आहे. कंपनीने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कारच्या किंमती वाढवण्याचा (Audi India Car Price Hike) निर्णय घेण्यात आला आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी सांगितलं की, “ऑडी इंडियामध्ये आम्ही शाश्वत व्यवसाय मॉडेल चालवण्यासाठी वचनबद्ध आहोत. वाढत्या खर्चामुळे आणि परकीय चलन दरातील बदलांमुळे आम्हाला आमच्या मॉडेल श्रेणीमध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची गरज आहे.”
ऑडी इंडियाच्या सध्याच्या लाईन-अपमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या ऑडी ए4, ऑडी ए6, ऑडी ए८8 एल, ऑडी क्यू2, ऑडी क्यू5, आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या ऑडी क्यू7, ऑडी क्यू8, ऑडी एस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस 5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस 7 स्पोर्टबॅक तसेच ऑडी आरएस क्यू8 चा समावेश आहे. ई-ट्रॉन ब्रॅण्ड अंतर्गत कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलियोमध्ये ऑडी ई-ट्रॉन 60, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ऑडी ई-ट्रॉन जीटीचा समावेश आहे.
ऑडी क्यू7 मध्ये सर्वोत्तम फीचर्स आहेत, जसे की अॅडप्टिव्ह एअर सस्पेंशन, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह, जे उच्च दर्जाची ड्रायव्हिंग क्षमता व हाताळणीमध्ये साह्य करते. ड्रायव्हरला साह्य करणारी वैशिष्ट्ये आहेत- पार्क असिस्ट प्लससह 360-डिग्री-व्ह्यू कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग. मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स व रिअर एलईडी टेल लॅम्प्सच्या माध्यमातून अपवादात्मक लायटिंग परफॉर्मन्सची खात्री मिळते. तसेच पुढील व मागील बाजूस डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स आहेत. आरामदायी वैशिष्ट्यांमध्ये 4-झोन एअर कंडिशनिंग, एअर आयनोझर व अरोमाटायझेशन, कॉन्टर अॅम्बियण्ट लायटिंगसह 30 रंग, बीअॅण्डओ प्रीमिअम 3डी साऊंड सिस्टिम यांचा समावेश असण्यासह इतर सर्वोत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत.
नवीन ऑडी क्यू7 प्रिमिअम प्लस व टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. ग्राहक त्यांच्या घरांमधून आरामशीरपणे ऑनलाइन ऑडी क्यू7 बुक करू शकतात किंवा जवळच्या ऑडी इंडिया डिलरशिपमध्ये त्यांची त्यांच्या इंटरेस्ट नोंदवू शकतात.
ऑडी इंडियाने 2021 साठी विक्रीमध्ये 101 टक्के वाढीची घोषणा केली. ब्रॅण्डने 3293 रिटेल युनिट्सच्या उत्तम विक्रीची नोंद केली. या वाढीला ऑडी ई-ट्रॉन 50, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ऑडी ई-ट्रॉन जीटी, ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी या पाच इलेक्ट्रिक कार्स आणि पेट्रोल सक्षम क्यू–रेंजसह ए-सेदान्सकडून चालना मिळाली. 2021 मध्ये ई-ट्रॉन ब्रॅण्डअंतर्गत पाच मॉडेल्ससह नऊ नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आले.
इतर बातम्या
घरबसल्या शोरूममधून कार खरेदीचा अनुभव घ्या, MG Motor चा ‘एमजी एक्स्पर्ट’ प्लॅटफॉर्म लाँच
बहुप्रतीक्षित Skoda Slavia भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स