Ayodhya | इलेक्ट्रिक कारने करा ‘रामलल्ला’ चे दर्शन! अयोध्येत Tata ची ही कार तैनात

| Updated on: Jan 04, 2024 | 2:17 PM

Ayodhya | अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी टाटा कंपनीच्या या इलेक्ट्रिक कार भाविकांच्या दिमतीला असतील. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्या आणि लखनऊ या दोन शहरांदरम्यान 15 इलेक्ट्रिक वाहनांची सोय केली आहे. भविष्यात यापेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Ayodhya | इलेक्ट्रिक कारने करा रामलल्ला चे दर्शन! अयोध्येत Tata ची ही कार तैनात
Follow us on

नवी दिल्ली | 4 जानेवारी 2024 : अयोध्येत आगामी 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. राम मंदिराच्या या भव्य कार्यक्रमासाठी पर्यावरण पूरक वाहने दिमतीला असतील. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्या आणि लखनऊ या दोन शहरात इंटरसिटी प्रवासासाठी 15 इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा केली आहे. भाविकांना या दोन शहरात प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करता येईल. भविष्यात यापेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा कंपनीच्या कारची खरेदी करण्यात आली आहे.

भाविकांसाठी ई-कार्ट सेवा

अयोध्या विकास प्राधिकरणाने पर्यावरण पूरक योजनांवर काम सुरु केले आहे. अयोध्येत चार भाविकांची सोय होईल अशा 15 इलेक्ट्रिक कारची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या वर्षी दीपोत्सव कार्यक्रमानंतर अयोध्येत ई-कार्ट सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये एकाचवेळी 6 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा वापर मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात येतो. या सोयीआधारे श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसराची प्रदक्षिणा पूर्ण होते.

हे सुद्धा वाचा

200 ईव्ही कारचा वापर

मेक इन इंडियाच्या पहिल्या टप्प्यात टाटा टिगोर ईव्ही कार तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी अयोध्या विकास प्राधिकरणाने इलेक्ट्रिक कारची सेवा सुरु केली आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी या दरम्यान अयोध्येत विविध कलाकार, पर्यटक आणि भाविक भक्तांसाठी 200 ईव्ही कार दाखल होण्याची शक्यता आहे.

कशी बुक कराल ही कार

पॅशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने माय ईव्ही प्लस या नावाने कॅब सेवा सुरु केली आहे. पिक अँड ड्रॉप सेवा 6 जानेवारीपासून अयोध्या विमानतळावरुन सुरु होत आहे. ही सेवा संपूर्ण अयोध्येत सुरु असेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना व्हॉट्सअप क्रमांक 9799499299 यावर संपर्क करता येईल.

किती द्यावे लागेल तिकीट

लखनऊ आणि अयोध्या या दोन शहरादरम्यान ही सेवा सुरु होत आहे. एका बाजूच्या प्रवासासाठी प्रवाशांना 3000 रुपये मोजावे लागतील. तर अयोध्येत भाविकांना 0 ते 10 किमीसाठी 250 रुपये, 0-15 किमीसाठी 399 रुपये, 0-20 किमीसाठी 499 रुपये, 20-30 किमीसाठी 799 रुपये, 30 ते 40 किमीसाठी 999 रुपये भाडे द्यावे लागेल.