मुंबई : देशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) मंगळवारी त्यांची लोकप्रिय बाइक प्लॅटिना 100 इलेक्ट्रिक स्टार्ट (ES) ची नवीन आवृत्ती बाजारात आणली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत या बाईकची एक्स शोरूम किंमत 53,920 रुपये ठेवण्यात आली आहे. (Bajaj Auto launches new Platina 100cc Electric Start at Rs 53920 know more about it)
बजाज ऑटोने ही बाइक स्प्रिंग-इन-स्प्रिंग सस्पेन्शनसह सादर केली आहे जी लांबच्या प्रवासादरम्यान अधिक आराम देते आणि रायडर तसेच त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशासाठीदेखील सोयीस्कर आहे. यात ट्यूबलेस टायर्सही देण्यात आले आहेत, जे सुरक्षित आणि हॅसल-फ्री रायडिंगसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
कंपनीचे मार्केटिंग प्रमुख नारायण सुंदरमण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्लॅटिना हा एक असा ब्रँड आहे ज्या ब्रँडकडे 7 मिलियनहून (70 कोटी) अधिक समाधानी ग्राहक आहेत, त्यामुळेच या सेगमेंटमध्ये प्लॅटिना हा एक चांगला पर्याय आहे. ते पुढे म्हणाले की नवीन प्लॅटिना 100 ईएस ही ग्राउंड ब्रेकिंग किंमतीत चांगली ऑफर देत आहे जी किक-स्टार्ट रायडर्सना सेल्फ-स्टार्टमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय देते.
या बाईकमध्ये तुम्हाला 102 सीसी फोर स्ट्रोक सिंगल सिलिंडर SOHC एअर कूल्ड इंजिन मिळेल जे 7,500 आरपीएम वर जास्तीत जास्त 7.9 पीएस आणि 5,500 आरपीएम वर 8.34 एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. यासह, तुम्हाला फोर-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन युनिट मिळेल.
या बाईकच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये बेटर व्हिजिबिलिटी आणि ओव्हरऑल लुकसाठी रीअरव्ह्यू मिरर देण्यात आला आहे. ही बाईक कॉकटेल वाइन रेड आणि सिल्व्हर डिकल्ससह इबोनी ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आली आहे. ही बाईक भारतातील सर्व अधिकृत बजाज ऑटो डीलरशिपमधून खरेदी केली जाऊ शकते.
दुचाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटोने सोमवारी सांगितले की फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या वाहनांची एकूण विक्री 6 टक्क्यांनी वाढून 3,75,017 वाहनांवर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी याच महिन्यात त्यांनी 3,54,913 वाहने विकली होती. फेब्रुवारी महिन्यात कंपनीची देशांतर्गत बाजारात होणारी विक्री 2 टक्क्यांनी घसरून 1,64,811 वाहनांवर गेली, गेल्या वर्षी कंपनीने याच महिन्यात 1,68,747 वाहनांची विक्री केली होती.
कंपनीने म्हटले आहे की, फेब्रुवारीत त्याचा निर्यात व्यवसाय 13 टक्क्यांनी वाढून 2,10,206 वाहनांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी 1,86,166 वाहने निर्यात केली होती. बजाज ऑटो कंपनीची दुचाकींची विक्री फेब्रुवारीमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 3,32,563 वाहनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 3,10,222 दुचाकींची विक्री केली होती. कंपनीच्या व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री 5 टक्क्यांनी घसरून 42,454 वाहनांवर गेली आहे, त्या तुलनेत एक वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने 44,691 व्यावसायिक वाहनांची विक्री केली होती.
Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 36 टक्क्यांची वाढ#CarSales #Toyota #ToyotaKirloskar https://t.co/6gqutcUe2J
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
इतर बातम्या
बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवण्याला प्राधान्य, खर्च किती?
दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या ‘या’ तीन 300cc बाईक्सपैकी कोणती बाईक आहे तुमच्यासाठी बेस्ट?
केवळ 2,499 रुपयात घरी न्या होंडाची शानदार बाईक आणि स्कूटर, मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक
(Bajaj Auto launches new Platina 100cc Electric Start at Rs 53920 know more about it)