Bajaj Chetak येतेय, TVS iQube आणि Ola S1 स्कूटरला टक्कर देणार? जाणून घ्या

| Updated on: Dec 19, 2024 | 2:08 PM

बजाजची नवी इलेक्ट्रिक चेतक स्कुटर TVS iQube आणि ओला Ola S1 ला टक्कर देण्यासाठी येत आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स आणि उत्तम बॅटरी पॅक मिळू शकतो. याची किंमत आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल संपूर्ण तपशील येथे वाचा. ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा कशी वेगळी असेल?

Bajaj Chetak येतेय, TVS iQube आणि Ola S1 स्कूटरला टक्कर देणार? जाणून घ्या
Follow us on

प्रदूषण मुक्त करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत अनेक मोठ्या कंपन्यांनी त्याच्या नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लौंच केल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा कळ हा इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याकडे वळत आहे. तुम्हाला बजाज कंपनीची चेतक या स्कुटरचा नवीन मॉडेल लवकरच पाहायला मिळणार आहे. कारण बजाज त्यांची नवी इलेक्ट्रिक चेतक स्कुटर बाजारात आणणार आहे. बजाज कंपनीची चेतक ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. बाजारात बजाज चेतकची टक्कर टीव्हीएस आयक्यूब, ओला एस १ आणि अथर रिज्टा शी होणार आहे. कंपनी या आठवड्यात त्यांची नवीन स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्कुटरमध्ये तुम्हाला नवीन फीचर्ससह दमदार बॅटरी पॅक मिळणार आहे.

रिपोर्टनुसार, नवीन बजाज चेतकमध्ये नवीन चेसिस असेल ज्यामध्ये फ्लोअरबोर्डखाली बॅटरी पॅक दिसू शकतो. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरसाठी मोठ्या बूटवर ही काम करत आहे.

बजाज चेतकचे फीचर्स

बजाज चेतक सध्या 2.88kWh आणि 3.2kWh अशा दोन बॅटरी पॅकच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आगामी मॉडेल मोठ्या बॅटरी पॅकसह एन्ट्री घेण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना नव्या मॉडेलमध्ये अधिक बॅटरी पॅक पाहायला मिळतील.

बजाज चेतकची सध्याची रेंज फुल चार्जवर १२३ किमी ते १३७ किमी पर्यंत आहे. तसे तर हे बॅटरी पॅकवर अवलंबून असते. त्यामुळे आता मोठ्या बॅटरी पॅकसह येणारी नवीन चेतकमध्ये रेंज वाढण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची (एक्स-शोरूम, बेंगळुरू) किंमत 95,998 रुपयांपासून सुरू होते आणि 1,28,744 रुपये पर्यंत जाते.मात्र नवीन इलेक्ट्रिक बजाज चेतकच्या किंमतीचा सध्या अंदाज बांधता येत नाही.कारण कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये.

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर

TVS iQub ST ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात ७ इंचाचा TFT टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. TPMS, कनेक्टिव्हिटी फीचर्स, ३२ लिटरची बूट स्पेसही उपलब्ध आहे. या स्कुटरच्या 5.1kWh व्हेरियंटच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर याचा टॉप स्पीड 82 किलोमीटर प्रति तास आहे. 3.4kWh व्हेरिएंटचा टॉप स्पीड 78 किमी प्रति तास आहे. याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत १.५५ लाख रुपयांपासून १.८३ लाख रुपयांपर्यंत आहे.