मुंबई : बजाज (Bajaj) ऑटोने ग्राहकांसाठी नवीन फीचर्स असलेली आणि परवडणाऱ्या दरातील 125 सीसी बाईक लाँच केली आहे, तीचे नाव बजाज सीटी 125 एक्स (Bajaj CT 125X) असे आहे. ही बाईक कंपनीच्या CT110X या बाईकसोबत मेळ खाते. बजाजने ही बाईक तीन ड्युअल-टोन पँट मॉडेल्समध्ये लाँच केली आहे. या बाईकचे एक मॉडेल ग्राहकांना ब्लॅक व निळ्या कलर कॉम्बिनेशनसह मिळते तर दुसरे मॉडेल ब्लॅक आणि रेड कलर कॉम्बिनेशनसोबत व तिसरे मॉडेल ब्लॅक व ग्रीन कलर कॉम्बिनेशनसह उपलब्ध होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून बजाज CT 125 cc मॉडेलची किंमती, डिझाईन (Design) व फीचर्सबाबत माहिती घेणार आहोत.बजाज CT 125X एक्सशोरूम किंमतीबद्दल सांगायचे तर, कंपनीने या नवीन बाईकची किंमत 71,354 रुपये (दिल्ली एक्सशोरूम) निश्चित केली आहे. या किमतीत, बजाजची ही बाईक बाजारात Honda Shine व्यतिरिक्त Hero Super Splendor आणि TVS Radeon सारख्या बाईकशी स्पर्धा करेल.
डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, CT125X हॅलोजन बल्ब आणि राउंड हेडलॅम्पसह उपलब्ध आहे. यासोबतच, एलईडी डे टाईम रनिंग लॅम्प स्ट्रिपसह हेडलॅम्प्स कव्हर करणारी एक छोटी काउल देखील आहे. या बाईकवर बाजूला असलेल्या फ्यूअल टाकीवर ग्राफिक्स पाहायला मिळतील. बाईकच्या मागील बाजूस, जड वस्तू वाहून नेण्यासाठी एक ग्रॅब रेल मिळेल. या नवीन बाईकमध्ये बसण्याची क्षमता देखील चांगली देण्यात आली आहे. बाइकचे सिंगल पीस सीट बरेच लांब असल्याने परिणामी मागे बसलेली व्यक्ती आणि रायडर दोघांनाही पुरेशी जागा मिळेल. कंपनीने बाईकच्या बॉडीवर्कवर फारसे काम केलेले नाही पण रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ही बाईक मार्केटमध्ये आणण्यात आली आहे.
बाईकच्या इंजिनला खडबडीत रस्ते आणि मोठ्या स्पीड ब्रेकर्सपासून वाचवण्यासाठी कंपनी बेली पॅन देखील देत आहे. ही बाईक ट्यूबलेस टायर्स, अलॉय व्हील आणि फोर्क गेटर्स या फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे, तसेच सीटमध्ये टीएम फोमचा वापर करण्यात आला आहे. पुढील टायर 80/100 आणि मागील टायर 100/90 आहे आणि दोन्ही 17 इंच आकाराचे आहेत. या बाईकमध्ये 124.4 cc 4 स्ट्रोक इंजिन आहे, कंपनीने त्यात DTS-i तंत्रज्ञान वापरले आहे. इंजिन पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, इंजिन 8000 rpm वर 10.9 PS पॉवर आणि 5500 rpm वर 11Nm पीक टॉर्क आउटपुट तयार करण्यास सक्षम आहे. ही बाईक 5 स्पीड ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.