मुंबई : बजाज ऑटोने (Bajaj Auto) प्लॅटिना 100 इलेक्ट्रिक स्टार्ट (Platina 100 Electric Start) लॉन्च केल्यानंतर आता कंपनीने अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमने (ABS) सुसज्ज अशी नवीन ऑल-न्यू प्लेटिना 110 (All New Platina 100) बाइक बाजारात सादर केली आहे. या सेगमेंटमधील सेफ्टी नेट फीचर्स असणारी ही पहिली मोटरसायकल आहे. दिल्लीत या बाईकची एक्स-शोरूम किंमत 65,920 रुपये आहे. (Bajaj Platina 110 ABS variant launched in India, know price and specs)
या बाईकच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने रीफ्रेश्ड लुकसह ही बाईक बाजारात आणली असून त्यात नवीन मिरर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे या बाईकची व्हिजीबिलिटी सुधारली आहे. बजाजने ही बाईक तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केली आहे, ज्यात व्हॉल्कॅनिक रेड, चारकोल ब्लॅक आणि बीच ब्लू कलरचा समावेश आहे. देशभरातील सर्व बजाज ऑटो डीलरशिपवरून ग्राहकांना ही बाईक खरेदी करता येईल.
या बाईकमध्ये 115 सीसी फोर-स्ट्रोक, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे जे इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन सिस्टमसह सुसज्ज आहे. हे इंजिन 7000 rpm वर 8.6 PS उर्जा आणि 5000 rpm वर 9.81 Nm टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त या बाईकमध्ये फोर स्पीड ट्रान्समिशन युनिट आहे.
ABS व्यतिरिक्त नवीन प्लॅटिना कंपनीच्या ‘ComforTec package’ मध्ये येते ज्यात क्विल्टेड सीट्स, स्प्रिंग नाइट्रॉक्स स्प्रिंग ऑन स्प्रिंग सस्पेंशन आणि ट्यूबलेस टायर्सचा समावेश आहे. नवीन ABS सुरक्षा प्रणाली 240 mm फ्रंट डिस्क ब्रेकसह देण्यात आली आहे.
या बाईकच्या लॉन्चिंग दरम्यान बजाज ऑटो लिमिटेडच्या डोमेस्टिक मोटरसायकल बिझिनेस युनिटचे अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले की, नवीन प्लॅटिना 110 एबीएस रायडर्सना पूर्ण कंट्रोल देऊन अतुलनीय सुरक्षा प्रदान करते. आम्हाला आशा आहे की देशातील वेगवेगळ्या भागात आणि रस्त्यावरुन प्रवास करणारे लाखो भारतीय स्वत:चे आणि त्यांच्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी याची दखल घेतील.
कानडे पुढे म्हणाले की, प्लॅटिना हा ब्रँड तिच्या सेगमेंटमध्ये 7 मिलियनहून (70 लाख) अधिक समाधानी ग्राहकांसह सर्वात पुढे आहे आणि त्यामध्ये एबीएसची भर पडल्यामुळे ही बाईक आता तिच्या प्रतिस्पर्ध्यांना अजून मागे टाकणार आहे.
या बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल (फीचर्स) सांगायचे तर यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह 20 टक्के जास्त लांबीचे फ्रंट आणि रियर सस्पेन्शन, लाँग क्विल्टेड सीट्स, इंटिग्रेटेड डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प आणि अॅनालॉग स्पीडोमीटर देण्यात आला आहे.
‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी#ElectricVehicles #ElectricBike https://t.co/qnjrEMFa8R
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
संबंधित बातम्या
‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी
Platina 100 Electric Start चं नवं एडिशन बाजारात, 53 हजारात घरी न्या शानदार बाईक
बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवण्याला प्राधान्य, खर्च किती?
(Bajaj Platina 110 ABS variant launched in India, know price and specs)