मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 110 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचा मोर्चा इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळवला आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 4 इलेक्ट्रिक स्कूटर्सची माहिती देणार आहोत. या गाड्यांच्या किंमती 41 हजार रुपयांपासून सुरु होत आहेत. (Best Electric Scooters in India, cheapest ev Scooters, Ola S1, Detel Easy Plus, Ampere Magnus EX, Simple One, TVS iQube)
पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेले नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, भारतात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर्स, इलेक्ट्रिक बाईक्स आणि कार्स उपलब्ध आहे.
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपीने डिटलची (Detel) इलेक्ट्रिक टू-व्हीलर डिटल इझी प्लस (Detel Easy Plus) भारतात उपलब्ध आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक बाईक 41,999 रुपये किंमतीत बाजारात दाखल केली आहे. ही B2C ई-बाईक केवळ 1999 रुपये देऊन www.detel-india.com या वेबसाईटद्वारे प्री-बुक केली जाऊ शकते. या डिटल बाईकला 170 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळेल. विशेष म्हणजे ही बाईक भारतीय रस्त्यांनुसार डिझाइन करण्यात आली आहे. या लो-स्पीड वाहनात 20AH लिथियम-आयन बॅटरी दिली जाते आणि ही बाईक अवघ्या 4 ते 5 तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही बाईक सिंगल चार्जमध्ये 60 किमी पर्यंतची रेंज देते. ही इलेक्ट्रिक बाईक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे जी स्थिरतेची उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करते. Easy Plus मेटल एलॉय, पावडर-कोटेड आणि ट्यूबलेस टायर्ससह डिझाइन केली आहे. जे सर्व प्रकारच्या रस्त्यांशी सुसंगत आहे, मग ते शहरातील रहदारीचे रस्ते असो किंवा गावातील. डिटल इझी प्लस मेटॅलिक रेड, पर्ल व्हाइट, गनमेटल, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक यलो कलरमध्ये उपलब्ध आहे आणि 170 किलोग्रॅमपर्यंत वजन वाहून नेण्याची या बाईकची क्षमता आहे. याव्यतिरिक्त, इझी प्लस 250 वॅटच्या इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते. ज्याद्वारे ही बाईक 25 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावते.
ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.
एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी (Greaves Electric Mobility) अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड अॅम्पियर इलेक्ट्रिकने नवीन अॅम्पीयर मॅग्नस एक्स (Ampere Magnus EX) सह त्यांची प्रसिद्ध अॅम्पियर मॅग्नस रेंज पुढे नेली आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) द्वारे प्रमाणित, अॅम्पियर मॅग्नस एक्स सिंगल चार्जमध्ये 121 किमीची रेंज देते आणि त्याची किंमत 68,999 रुपये (एक्स-शोरूम, पुणे) इतकी आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
अॅम्पियर मॅग्नस EX एक नाविन्यपूर्ण स्लॉटेड क्रॅडल फ्रेमसह येते जे मोठ्या अंडरसीट स्टोरेजची जागा जागा देते आणि फ्रेमच्या परफेक्ट स्थितीमुळे बॅटरी घरी नेऊन चार्ज करता येते, अगदी उंच इमारतींमध्येही. कंपनीच्या मते, मॅग्नस EX ची रचना ग्राहकांचा अभिप्राय लक्षात घेतल्यानंतर केली गेली आहे आणि दररोज वापरकर्त्यांसाठी एक उत्तम बॅटरी आणि सोयीस्कर बूट स्पेस आणि उत्कृष्ट स्पेस मॅनेजमेंटसह प्रॅक्टिकल कॉम्बिनेशन प्रदान करेल. घर, कार्यालय, कॉफी शॉप किंवा वॉल चार्ज पॉईंटवरील कोणत्याही प्लगवर कोणत्याही 5 एएमपी सॉकेटमध्ये सुलभ चार्जिंगसाठी मॅग्नस एक्स रिमूव्हेबल आणि हलक्या लिथियम आयन बॅटरीसह येते.
मॅग्नस EX शहरांमध्ये 53 किमी प्रति तास ड्रायव्हिंग स्पीडसह धावते आणि त्याची 1200 डब्ल्यू मोटर 10 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास इतका वेग धारण करते. मॅग्नस EX मध्ये दोन रायडिंग मोड आहेत, सुपर सेव्हर इको मोड आणि पॉवर मोड, जे लांब पल्ल्याची रेंज आणि आवश्यकतेनुसार परफॉर्मन्स देतात. मॅग्नस EX ला एक शक्तिशाली एलईडी हेडलाइट, 450 मिमी लेगरूम स्पेस मिळते आणि तीन वर्षांची वॉरंटी (मेन अॅग्रिगेट्स आणि आफ्टरकेयर वर) देण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप सिंपल एनर्जीने (Simple Energy) ऑगस्ट महिन्यात देशातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 1.10 लाख रुपये या किंमतीमध्ये (एक्स-शोरूम) लाँच केली आहे. सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 4.8 kWh पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे, या बॅटरीचं वजन 6 किलोपेक्षा जास्त आहे. या स्कूटरच्या डिटॅचेबल आणि पोर्टेबल नेचरमुळे ई-स्कूटरची बॅटरी घरी चार्ज करणे सोपे होईल. साध्या लूप चार्जरने जरी ही स्कूटर चार्ज केली तरी 60 सेकंदांच्या चार्जिंगवर ही स्कूटर 2.5 किमीपर्यंत धावेल. EV कंपनी पुढील तीन ते सात महिन्यांत देशभरात 300 हून अधिक फास्ट चार्जरदेखील स्थापित करेल.
ई-स्कूटर सिंगल चार्जमध्ये इको मोडमध्ये 203 किलोमीटर आणि आयडीसी स्थितीत 236 किलोमीटरची रेंज प्रदान करेल. या स्कूटरचं टॉप स्पीड 105 किमी प्रति तास इतकं आहे. ही स्कूटर 3.6 सेकंदात 0 ते 50 किमी प्रति तास, 0 ते 40 किमी प्रति तास वेग 2.95 सेकंदात धारण करु शकते. स्कूटरला 4.5 KW चे पॉवर आउटपुट आणि 72 Nm चे टॉर्क मिळते. इलेक्ट्रिक स्कूटर फ्यूचरिस्टिक डिझाईनला सपोर्ट करेल आणि मिड-ड्राइव्ह मोटरवर आधारित असेल. यात 30 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे, 12-इंचांची चाके, 7-इंचांचा डिजिटल डॅशबोर्ड, ऑन-बोर्ड नेव्हिगेशन, जिओ-फेन्सिंग, एसओएस मेसेज, डॉक्यूमेंट स्टोरेज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असेल.
TVS iQube ची ऑन-रोड किंमत 1.10 लाख रुपये इतकी आहे. टीव्हीएसचा दावा आहे की, ही स्कूटर सिंगल चार्जवर 75 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तर, ही स्कूटर शून्य ते 40 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडण्यासाठी 4.2 सेकंद घेते. स्कूटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रति तास इतका आहे. TVS iQube मध्ये 4.4 इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम-आयन बॅटरी दिली असून पूर्ण चार्ज होण्यासाठी ही 5 तासांचा वेळ घेते. कंपनी TVS iQube सोबत 3 वर्ष किंवा 50 हजार किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देते.
इतर बातम्या
कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत
ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट
PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास
(Best Electric Scooters in India, cheapest ev Scooters, Ola S1, Detel Easy Plus, Ampere Magnus EX, Simple One, TVS iQube)