‘या’ बाइक्सची किंमत 70 हजारांपेक्षा कमी, देते 70 किमीपेक्षा जास्त मायलेज

| Updated on: Dec 04, 2024 | 6:59 PM

जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन वापरासाठी बाईक घ्यायची असेल आणि बजेट कमी असेल तर तुम्हाला ही माहिती खूप आवडेल. 70 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या आणि ज्यांचे मायलेज 70 किमीपेक्षा जास्त आहे अशा बाइक्सचा तपशील येथे पहा.

या बाइक्सची किंमत 70 हजारांपेक्षा कमी, देते 70 किमीपेक्षा जास्त मायलेज
Follow us on

रोजच्या अपडाऊनसाठी बाईक घेण्याचा विचार केला तर प्रत्येकजण उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असतो. त्यात अनेकांच्या बाईक खरेदी करण्यासाठी खर्चही बजेटमध्ये असतो आणि त्यात मायलेज जास्त देणारी बाईक हवी असते. तुमचा देखील बाईक खरेदी करण्यासाठी अशीच मागणी असेल तर तुमच्याकरिता या 4 बाइक्सचे नाव आले नाही तर तसे होऊ शकत नाही. Hero HF 100, Bajaj CT 100, TVS Sport आणि Bajaj Platina या बाकीस तुमच्या दोन्ही मागण्या पूर्ण करतात. या बाईक देखील बऱ्यापैकी क्लासी आहेत आणि लांबच्या प्रवासासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात.

Hero HF 100

हीरोची ही बाईक बजेटमधील सर्वात लोकप्रिय बाईक आहे. या बाईकमध्ये ९७.२ सीसीइंजिन आहे जे ८.०२ बीएचपीपॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये ७० किलोमीटरचे मायलेज देऊ शकते. याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हिरो एचएफ 100 ची एक्स शोरूम किंमत 59,018 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात.

Bajaj CT 100

बजाज सिटी १०० मध्ये ९९.२७ सीसीचे इंजिन आहे जे ७.७९ बीएचपी पॉवर आणि ८.३४ एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये ७५ किलोमीटर प्रति लीटरमायलेज देते. बजाज सीटी १०० ची एक्स शोरूम किंमत ६२,२६५ रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

TVS Sport

टीव्हीएस स्पोर्ट ही बाईक देशातील सर्वात स्वस्त बाईकपैकी एक आहे, या बाइकमध्ये तुम्हाला 109.7 सीसीइंजिन पाहायला मिळते, जे 8.19 पीएसची जास्तीत जास्त पॉवर आणि 8.7 एनएमचा कमाल टॉर्क जनरेट करते. हे एक लिटर पेट्रोलमध्ये ७० किलोमीटरचे मायलेज देऊ शकते. टीव्हीएस स्पोर्टची एक्स शोरूम किंमत 59,881 रुपये आहे.

Bajaj Platina 100

बजाजची ही बाईक उत्कृष्ट मायलेज देते, कंपनीने या बाईकमध्ये १०२ सीसीचे इंजिन दिले आहे, जे ७.७९ बीएचपीची कमाल पॉवर आणि ८.३४ एनएमचा कमाल टॉर्क जनरेट करते. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये ७२ किमी प्रति लीटर पर्यंत प्रवास करू शकते. बजाज प्लॅटिनाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या बाईकची ॲक्सेस-शोरूम किंमत 68,262 रुपये आहे.