मुंबई : जर्मन लक्झरी कार ब्रँड बीएमडब्ल्यूने (BMW) ने बुधवारी इंजिनला आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन 10 लाखांहून अधिक कार परत मागवण्याची (Car Recall) घोषणा केली. ऑटोमेकरने म्हटले आहे की, प्रभावित BMW कारमध्ये खराब इंजिन व्हेंटिलेशन सिस्टम आहे. त्यामुळे ते ओवरहीटिंगचा बळी ठरू शकतात आणि त्यामुळे आग लागण्याचा धोका (Engine fire risk) वाढू शकतो. कार निर्मात्या कंपनीने सांगितले की, रिकॉल मोहिमेमुळे यूएसमधील सुमारे 9,17,000 कार आणि SUV प्रभावित झाल्या आहेत. याशिवाय, कॅनडातील 98,000 वाहने आणि दक्षिण कोरियातील 18,000 कार देखील परत मागवण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे.
प्रभावित वाहनांमध्ये 2006 ते 2013 दरम्यान निर्मित अर्धा डझन BMW वाहनांचा समावेश आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाने (NHTSA – National Highway Traffic Safety Administration ) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सांगितले की, यापैकी बहुतांश BMW कार याआधी परत मागवण्यात आल्या होत्या. प्रोडक्शन फॉल्ट Mahle GmbH मुळे झाला आहे. ही कंपनी बीएमडब्ल्यूची प्रमुख पुरवठादार कंपनी आहे.
BMW ला 2019 पासून इंजिन कंपार्टमेंट ओव्हरहीटिंगबाबत अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे कंपनीला बाधित वाहने परत बोलावावी लागली. गेल्या महिन्याच्या अखेरीस, या समस्येमुळे आणखी नुकसान आणि इंजिनला आग लागण्याची शक्यता होती हे निश्चित झाले. त्यामुळे जर्मन कार निर्मात्या कंपनीने आठवडाभरापूर्वी स्वेच्छेने कार्स परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
बाधित वाहनांची दुरुस्ती अधिकृत डीलरशिपवर केली जाईल. बीएमडब्ल्यूने असेही म्हटले आहे की, या वर्षाच्या मध्यापर्यंत सर्व प्रभावित वाहने दुरुस्त केली जातील.
इतर बातम्या
उत्तर प्रदेशाच्या निवडणुका संपल्या; आता पेट्रोल-डिझेल भडकणार; या दिवसांपासून दर वाढणार
होळीनिमित्त Mahindra ची शानदार ऑफर, लोकप्रिय गाड्यांवर 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी
31 किमी मायलेजसह Maruti Dzire CNG बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स