मुंबई : बीएमडब्ल्यू (BMW) या लक्झरी वाहन निर्मात्या कंपनीने या वर्षी मे महिन्यात त्यांची ऑल-इलेक्ट्रिक सेडान i4 (BMW electric Sedan i4) लॉन्च करण्याची योजना आखली आहे. जर्मन कार निर्माता ऑटोमोटिव्ह ग्रुप BMW 2022 मध्ये भारतात 19 कार आणि पाच मोटारसायकल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. पीटीआयच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीत चारचाकी वाहनांच्या विक्रीत 25 टक्के आणि दुचाकींच्या विक्रीत 41 टक्के वाढ झाल्याचे ऑटोमेकरचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे सेमीकंडक्टरची (Semiconductor) कमतरता आणि पुरवठा साखळीत खंड पडूनही कंपनीने या मोठ्या सेलची नोंदणी केली आहे.
जानेवारी-मार्च 2022 या कालावधीत, BMW ग्रुपने आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम विक्री नोंदवली आहे, कंपनीने चारचाकी वाहनांच्या विक्रीत 2,815 युनिट्सच्या विक्रीसह 25.3 टक्के वाढ नोंदवली आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीत कार निर्मात्या कंपनीच्या सेडान आणि SUV च्या रेंजने 2,636 युनिट्स विकल्या, तर मिनी लक्झरी कॉम्पॅक्ट कारने 179 युनिट्स विकल्या. BMW Motorrad ने देखील या कालावधीत 1,518 युनिट्स विक्रीसह 41.1 टक्के वाढ नोंदवली आहे.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह म्हणाले की, “सध्या सप्लाय लिमिटेड आहे. आम्ही आणखी बऱ्याच गाड्या विकू शकलो असतो, कारण आमच्याकडे चारचाकी वाहनांसाठी सुमारे 2,500 ऑर्डर आहेत आणि मोटारसायकलसाठी 1,500 हून अधिक ऑर्डर आहेत. अक्षरशः, तुम्ही म्हणू शकता की आम्ही आमची विक्री दुप्पट करु शकतो. पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि सेमीकंडक्टरचा तुटवडा याने विक्रीवर मोठा परिणाम केला.”
2022 च्या पहिल्या तिमाहीवर आधारित अपेक्षित पूर्ण वर्षाच्या सेल परफॉर्मन्सबद्दल बोलताना, पावाह म्हणाले की, “जगभरातील सर्व लॉजिस्टिक आव्हाने आणि पुरवठ्याच्या परिस्थितीसह ही एक गतिशील परिस्थिती आहे, यात कंपनी कसं काम करते यावर सेल अवलंबून आहे. आमच्याकडे एक चांगली ऑर्डर पाइपलाइन आहे. जर आम्ही या ऑर्डर पूर्ण करू शकलो, तर आम्ही निश्चितच एका मोठ्या सेलची नोंद करु. तसेच दुचाकींच्या विक्रीतही वाढ नोंदवू.”
The next in mobility has arrived with a promise of a sustainable future. It’s time to electrify joy. #JoyElectrified
To know more, visit the link in our bio pic.twitter.com/xBjAPjkul3
— bmwindia (@bmwindia) April 9, 2022
इतर बातम्या
वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर
Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती
3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स