तुम्हाला जर ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहने आणि बाईकच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची ही उत्तम संधी असेल. कारण ऑटो एक्स्पो हे इव्हेंट लवकरच सुरु होणार आहे. यासाठी अनेक मोठ्या ब्रँडच्या कंपन्या त्यांच्या मॉडेलचे प्रदर्शन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तर या इव्हेंटमध्ये BMW कंपनी सुद्धा त्यांच्या कारची झलक दाखवणार आहे. यासाठी BMW कंपनीने या इव्हेंटमध्ये BMW MINI आणि BMW Motorrad ची अनेक नवीन मॉडेल्स सादर करण्याची घोषणा केली आहे. १७ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे हे प्रदर्शन होणार आहे. प्रगती मैदानातील पॅव्हेलियन हॉल क्रमांक ६ मध्ये बीएमडब्ल्यू एक्स ३ सादर करण्यात येणार आहे. या बीएमडब्ल्यू कारचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी व्हेइकल (एसएव्ही) असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
BMW X3 या कारच्या मॉडेलमध्ये तुम्हाला नवीन टेक्नोलॉजी आणि उच्च क्वॅलिटीसह नवीन डिझाइन देखील मिळणार आहे. BMW X3 मध्ये बीएमडब्ल्यूच्या ऑपरेटिंग सिस्टम 9 सह उत्कृष्ट डिझाइन आणि उत्कृष्ट इंटिरियर देण्यात आलेले आहे. याशिवाय BMW i7, BMW X7, BMW 5 Series Long Wheelbase आणि BMW M5, BMW M4, BMW M2 सारख्या हाय परफॉर्मन्स कार देखील पॅव्हेलियनमध्ये दिसतील. बीएमडब्ल्यू मोटररॅड आपली नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस ॲडव्हेंचर तसेच बीएमडब्ल्यू एस 1000 आरआर सारख्या सुपर-स्पोर्ट मोटारसायकल लाँच करणार आहे. ट्रॅकवरील सर्वोत्तम कामगिरीसाठी हे डिझाइन केले गेले आहे.
यासोबतच BMW M 1000 XR, BMW F900 GS आणि BMW G 310 GS सारख्या बाईक देखील पाहायला मिळतील. याशिवाय BMW CE 02 आणि BMW CE 04 सारख्या इलेक्ट्रिक दुचाकीदेखील या इव्हेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मिनी इंडिया या इव्हेंटमध्ये खास मिनी कूपर एस जॉन कूपर वर्क्स (जेसीडब्ल्यू) पॅक लाँच करणार आहे. यात मिनीच्या डिझाइनला स्पोर्टी जेसीडब्ल्यू एलिमेंट्ससोबत जोडण्यात येणार आहे. मिनी कूपर एस आणि ऑल-इलेक्ट्रिक मिनी कंट्रीमॅन सारख्या नवीन मिनी कार देखील येथे प्रदर्शित केल्या जातील.
पॅव्हेलियनमध्ये येणाऱ्या लोकांना BMW, MINI आणि BMW Motorradचे लाइफस्टाइल कलेक्शन आणि ॲक्सेसरीज देखील खरेदी करता येतील. याशिवाय बीएमडब्ल्यू एम कारसह तज्ज्ञ ड्रायव्हर ट्रेनर्सकडून दररोज ड्रिफ्ट शो होणार आहेत.