मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती (Petrol Price Hike) कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या (Second Hand Bikes) दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. बजाज डिस्कव्हर 150 एस डिस्क (Bajaj Discover 150 S Disc) असं या या बाईकचं नाव आहे. ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता.
Bajaj ची ही बाइक bikedekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंटची बाइक आहे. नवीन Bajaj Discover 150 S Disc ची ऑन रोड किंमत जवळपास 60 हजार रुपये इतकी असली तरी सेकंड हँड सेगमेंटमध्ये ही बाईक 30,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Bajaj Discover 150 S Disc मध्ये 144.8 cc क्षमतेचं इंजिन आहे, जे 14.3 PS पॉवर आणि 12.75 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सिस्टम आहे. यामध्ये युजर्सना ट्युबलेस टायर्स मिळतील. ही बाईक 1 लीटर पेट्रोलमध्ये 72 किमी मायलेज देते.
bikedekho वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार हे 2015 चे मॉडेल आहे. या बाईकने 26000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच ही फर्स्ट ओनर बाइक आहे आणि ती मुंबईतल्या आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. कंपनीने या बाईकची एक रिपोर्ट लिस्ट जारी केली आहे, ज्यामध्ये सर्व फीचर्सचे स्टेटस जाहीर केले आहेत. ग्राहक BikeDekho कंपनीच्या वेबसाईटवरील मुंबई सेक्शनमध्ये ही बाईक पाहू शकतात. तिथे या बाईकबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात.
महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही bikedekho वरुन घेतली आहे.
इतर बातम्या
5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील
होळीनिमित्त Honda च्या गाड्यांवर 25000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, ऑफर 31 मार्चपर्यंत